श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ सूर माझा लागला... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
सूर माझा लागला
अन् अर्थ मजला उमगला
*
जीवनाचा मी प्रवासी, मी न आता थांबणार
गोड अथवा कटू असो ते सर्व काही चाखणार
मंत्र मजला पाठ आहे, थांबला तो संपला
*
निंदकांची झुंड येथे साथ देईना कुणीही
खंत ना त्याची मनाला मीच माझे गीत गाई
वाट काटृयातून जाता ताटवा मज लाभला
*
निसटले क्षण जे तयांचा शोक सारा व्यर्थ आहे
वेध घेण्या या तमाचा सूर्य माझा सज्ज आहे
रंगवावी नित्य स्वप्ने छंद मज हा लागला
*
सूर माझा लागला
अन् अर्थ मजला उमगला.
सुहास रघुनाथ पंडित. सांगली.
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





खूप छान कविता सर