श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🚩🛕🙏 अनोखी दिंडी ! 🙏🛕🚩श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

 *

दिंडी दंगली भक्तीत

चाले पंढरीची वाट

नभी जमले साथीला

काळे जलद घनदाट

 *

ताल धरुनी अभंगावरी

घेती मित्रांची गळाभेट

वाटे देती साथ मृदूंगाची

ऐकून तयांचा गडगडाट

 *

धारा बरसती सोबत

वाटती जणू तुळशीमाळा

डोलती तरुवेली वाऱ्यासवे

ठेक्यात वाजवती टाळा

 *

मधेच चमकून चपला

प्रकाश टाकी दिंडीवरी

वाट दावे वारकऱ्यांना

सुखरूप जाण्या पंढरी

 *

दिंडी बघा अशी अनोखी

उद्या पोहचेल पंढरपुरी

निसर्ग दे साथ भक्तांना

“त्याची” किमया न्यारी

“त्याची” किमया न्यारी

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments