श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सहिष्णूपणे ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अपेक्षांची अखंड पानगळ सोशित

वास्तवाच्या ग्रीष्मात

निष्पर्णपणाने उभं आहे झाड.

 

थेंबभर पाण्यासाठी दाही दिशांना

वणवणतायत मुळं,

पण चुकूनही मिळत नाही त्यांना

कणभरही ओलावा.

जाग येण्यापूर्वीच पाखरांचे निघून जाणे

गृहित धरलेले आहे झाडाने.

कृतघ्न हातातील कुऱ्हाडी अन् करवतींची

भीती तर आजन्मच दबा धरुन मनात.

 

” घरट्यांचे काय? ” विचाराल तर

ओकेबोकेपणीही झाडं उभं आहे

ते त्यांच्यासाठीच

सहिष्णूपणे.

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments