श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
कवितेचा उत्सव
☆ स्वप्नपूर्ती… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
(विषय- इच्छाशक्ती)
☆
प्रचंड इच्छाशक्ती
जागरूकपणे घेते
कठोर निर्णयशक्ती
स्वप्नपूर्ती करते
*
अडचणींवर मात करत
धेय्य मी गाठते
ना मज प्रतिसाद येत
परी अखेर स्वप्नपूर्ती करते
*
उलगडती अनेक पदरी
रहस्य हे आयुष्याचे
शब्दच येती अधरी
आधार हो मम सामर्थ्याचे
*
विश्वासाचा हात देत
मैत्रीची साद देते
प्रयत्नांची शिकस्त करत
सत्यात स्वप्न साकारते
*
एक पुर्ण होता दुसरे दिसते
ध्यास एकच स्वप्न पुर्तीचा
माळ स्वप्नांची छान विणते
वेध मज हो प्रतिसादाचा
☆
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




