श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
सरसर सर येते
क्षणात निघून जाते
मळभ मनातले
क्षणात पळून जाते…
*
विमल असा हा
मासोत्तम मास श्रावण
व्रत वैकल्यांचा अन्
संयमाचाही जाण..
*
वटपौर्णिमा, नागपंचमी
रक्षाबंधन अन् बाप्पाचे आगमन
उत्साह आणि चैतन्य
चराचरात अन् मनामनात…
*
मिष्टांनाची मेजवानी
रसनेची तृप्तता
मंगलमय वातावरण
श्रावण येता…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




