श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आला श्रावणमास... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

आला श्रावणमास

मनामनातून खुलवित आला एक नवा उल्हास

आला श्रावणमास

*

थेंब टपोरे सरले आता सर हलकिशी आली

नवा जन्म हा पुन्हा घेऊनी सृष्टी अवतरली

*

चहुबाजुंनी दिसते माया तेजाची पसरली

सौंदर्यांचे लेवून लेणे वसुंधरा ही सजली

*

सफेद, पिवळी, निळी, जांभळी फुले बहरली किती

वनावनातून रानफुलांच्या डोलू लागल्या पंक्ती

*

नाजुक नक्षी गुलबक्षीची, बकुलफुले, जास्वंदी

सडा शिंपीते गंधीत होऊन प्राजक्ताची फांदी

*

निळ्या नभातील सात रंग हे स्वर्गीचे सोपान

रंग तयांचे घेऊन आली फुलपाखरे छान

*

रंगमंच हा या जगताचा बदले क्षणोक्षणी

चहुबाजूंनी सुखवी नयना हिरवळ आणिक पाणी

*

सणासुदीचा, व्रत पूजेचा सुवासिनींचा मास

चैतन्याचा, हिरवाळीचा रंगीत गंधीत मास

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments