श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🙏 भूमितीतले कोन आणि दृष्टिकोन! 🙏 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
☆
तू मोठा की मी मोठा
झाले भांडण कोनांचे,
ऐकून धाबे दणाणले
गणिताच्या शिक्षकाचे!
*
लघु, विशाल, अती विशाल
तुटून पडले एकमेकांवरी,
काटकोन म्हणे सगळ्यांना
मीच तो जगात एक भारी!
*
त्यांचे भांडण सोडवायचा
केला प्रयत्न शिक्षकांनी,
पण सोडवता सोडवता आले
त्यांच्याच डोळ्यात पाणी!
*
जाता भांडण विकोपाला
गेले सारे हेडमास्तरांकडे,
तुम्हीच सोडवा भांडण,
घातले त्यांना मग साकडे!
*
“आपापल्या जागी तुम्ही
सारेच आहात हो मोठे,
करा विचार तुम्हा पटेल
माझे म्हणणे नाही खोटे!
पण,
सांगतो तुम्हां त्रिवार सत्य
जगात सर्वात मोठा कोण,
ठेवून विशाल आपले हृदय
दुसऱ्याकडे पहायचा दृष्टीकोन! “
दुसऱ्याकडे पहायचा दृष्टीकोन! “
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
२९-०७-२०२५
(सध्या 😅) – D-1, सुंदर सृष्टी, सन सिटी, आनंद नगर, वडगाव, पुणे.
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





वाह! छान विचार कवितेतून मांडले .