सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सुखाचा संसार… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार : अभंग – विषय : संसार)

संसार सुखाचा| करावा गोडीने|

आनंदें प्रेमाने|टिकवावा||||

*

सुख-दु:ख दोन्ही|साहावे जोडीने

|राखत गोडीने|एकमेका||||

*

संसाराचा रथ|पतीपत्नी चाके|

कौशल्याने बाके|चालवावा|||

*

सांगाती राहावे|क्रोधास टाळावे|

प्रेमाने जिंकावे|परस्परां||||

*

तंटा-वाद सारा|क्षणी विसरावा |

एकमेका द्यावा|आधारची||||

*

गोडी ती राखावी |साथ संगतीत|

मनीचे गुपित |ओळखावे |||

*

संसारासी अर्थ |देता होई सार्थ

ठरे ना तो व्यर्थ|जगामध्ये||||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments