सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ सामंजस्य सुश्री नीलांबरी शिर्के 

मी अविश्वाच्या गैरसमजाच्या

मातीत रोवल साम॔जस्याच बी

नुसत पेरलच नाहीतर

रूजवल खतपाणी देऊन

निकोप अस वाढवल ही!

त्याला फळही लागली गोड

खाणारांनी ती खाल्ली

अगदी मनापासून आवडीने

चाखत चोखत रस शोषत

पण

फळाच त्याच्या स्वादाच

कौतुक अजिबात नाही केल

याला कारण ती मातीच असावी कदाचित!

एक मात्र बर झाल

त्यांनी फळ खावून

साल तिथच टाकली

बियाही तिथल थुंकुन टाकल्या

झाडाला थोड समाधान मिळालं

आता मातीला सालांच खत मिळेल

बिया आपसुक रूजतील

सामंजस्याची झाड रूजतील

त्यांची संख्या वाढत जाऊन

गैरसमजाची मातीही

समुतदार सुपीकपणात गणली जाईल

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments