श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ कर्तृत्व… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
सुधारणांचा सोस असावा
जुना लाभण्या पुन्हा विसावा
*
समाजसेवा करणारला
कुटुंब वत्सल ज्ञात असावा
*
सुखात जनता वावरण्याला
गुंडगिरीला चाप बसावा
*
समर्थ करण्या व्याख्यानाला
आत्मस्तुतीचा दर्प नसावा
*
लिखानातल्या पसा-यातुनी
भरीव काही अर्थ निघावा
*
भक्कम करण्या आधाराला
आपुलकीने स्पर्श करावा
*
मैत्री मधल्या वागणुकीला
प्रेमाचा अनुबंध कळावा
*
समेट पुरता घडवायाला
तना मनाचा द्वेष जळावा
*
परोपकारी बनण्यासाठी
दातृत्वाचा हात मिळावा
*
यशसंपादन करण्यासाठी
कर्तृत्वाचा ध्यास जपावा
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



