श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ अनंतादी धन… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
हिरव्या -हिरव्या महलात
पाना फुलांची भव्य प्रजा
दव पांचूचे रत्नप्रासाद
भुलोकी नांदे सृष्टी राजा.
*
जीवलोकी भुरळ राज्य
रवी-शशी शलाका तेज
रंगबेरंगी पंख नाचे
नाद वायू गुंजन सेज.
*
कलकल प्रेम संवाद
धरा काळजात सौंदर्य
नीरलहरी मृगजळ
सरित सागराचे धैर्य.
*
बंध मृदमाता किमया
देव निर्मात्याचे गगन
दिन रजनी क्षितीजाशी
चक्र अनंतकाली धन.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






सुंदर!