सुश्री किशोरी उपाध्ये
स्व-परिचय
मी किशोरी उपाध्ये.
झेन्सार टेक्नॉलॉजीज येथे १७ वर्षं नोकरीचा अनुभव.
संगीत विशारद.
आता पूर्ण वेळ लिखाणासाठी देते असून,
कविता, लेख, कथा आणि कादंबऱ्या लिहिते.
अनेक कथा आणि कविता पारितोषिक प्राप्त असून अनेक दर्जेदार अंकांतून छापून आलेल्या आहेत. 🙏🏻
गायन, तसेच जपानी भाषा शिकवते.
कवितेचा उत्सव
☆ गाणे असे मीच व्हावे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
जे मला वाटते गुणगुणावे।
गाणे असे मीच व्हावे।।धृ।।
शब्द व्हावे निळे अंतरीचे धुके।
ओठी येऊनही राहिले जे मुके।
सूर आळवुनिया त्यांस गावे।।
गाणे असे मीच व्हावे।।१।।
*
वाहते सृष्टिबिंबास धरुनी उरि।
जाऊनी श्यामला त्या नदीच्या तीरी।
गंध वाऱ्यातले पिऊन घ्यावे।।
गाणे असे मीच व्हावे।।२।।
*
डोंगरांचे ऋतू भूमिचे सोहळे।
सूर साऱ्यांतुनी भेटती सावळे।
चांदणे होऊनिया झुलावे।।
गाणे असे मीच व्हावे।।३।।
☆
© सुश्री किशोरी उपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




