श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ देवबाप्पा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

माणसांची होत गेली श्वापदे

मोडताना शासनाचे कायदे

*

आठवेना काय होते बोलले

काढले मोडीत त्यांनी वायदे

*

जात काही जात नाही येथली

घालवाया ती मला तू साथ दे

*

रावणाला राम आहे जाळतो

पेटवाया पेटलेली वात दे

*

आज सारे सत्यवादी संपले

जगवण्या साठीच त्यांना श्वास दे

*

शोधणारे लाख वेळा शोधती

नेमके त्यांच्याच साठी फायदे,

*

देव बाप्पा सोड आता पेंगणे

पामरा त्या तूच थोडा न्याय दे

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
ज्योती कुळकर्णी अकोला
0

तुकाराम दादा छान गझल!