श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गीत… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आवडीचे आज माझ्या तू मजेने गीत गावे

घोळुनीओठातुनी तू शब्द त्याचे मंतरावे

*

शांतता घेवून आला सांज वेळी मंदवारा

काढुनी त्याचीच खोडी तूच त्याला आडवावे

*

चांदण्या आल्यात आधी चंद्र ही येतोय मागे

स्वागतासाठीच त्याला आग्रहाने बोलवावे

*

रातराणीचा इरादा कोणता आहे कळेना

ती हसेना ती खुलेना काय झाले ओळखावे

*

दाटतो अंधार आहे पाळतो आहे अबोला

मौन तू पाळू नको ना हासुनी त्या हासवावे

*

काळजाची काळजाला ओढ आहे भेटण्याची

जोडताना हात दोन्ही हे सख्याला जाणवावे

*

पोरक्या परके पणाला जाणवावा स्पर्श ताजा

दाह तेव्हा काळजाचा भेटुनीया शांतवावा

*

जीवनाला मोल आहे ते पुन्हा मिळणार नाही

माणसांनी माणसांना आदराने वागवावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ज्योती कुळकर्णी अकोला

तुकाराम दादा गझल छान!शेवटचा शेर,’ माणसाने माणसाला आवडावे’ मस्त!