डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

🍃 हे तथागता… 🍃 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

हे तथागता…

 तुझ्या विचारांशिवाय

 जगण्याला अर्थ नाही

 तुझ्याविना जगाच्या

 शांततेला पर्याय नाही.

*

तू कुणी परका नाहीस

 इतकं कळण्या इतपत

 माणूस, माणूस होऊ दे

 या मातीत रुजून तू

संपूर्ण आसमंत ही सृष्टी 

 व्यापून गेलास..

 हे जरा तरी उमगू दे

*

तुझ्या करुणेचा एक कण

 प्रत्येकाच्या मनात झिरपू दे

तुझ्या नसानसातून वाहणाऱ्या 

 मानवतेचा एखादा तुषार 

 आमच्या मस्तकात उमटू दे..!

*

तुझ्या पंचशील तत्वाने

 माणसाचं मन रंगवू दे

तुझ्या सत्य, सम्यक मार्गाने

 प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 

 स्मित फुलू दे..!

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments