सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ मी शहिद… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
सिमेवरती लढताना
नाही कुणास कळलो
तिरंग्याचे कफन ओढून
शहिद म्हणून ओळखलो
*
उरावर झेलल्या वारांची
विरमरणाने पुसली व्यथा
तिरंग्यात लपेटल्या देहाची
‘अमर रहें’ झाली गाथा
*
शौर्य आणि पराक्रमाचा
वर्दीस घातला कवळा
वर्दीतल्या मरणाचा तेंव्हा
झाला शहिद सोहळा
*
सुट्टीसाठी किती झंझटी !
लाख लाख लडतडी
तिरंग्यातून चाललो तेंव्हा
पटकन गेटवर जी. डी.
*
प्राणाची बाजी लावूनही
अर्थ नसतो जगण्याला
पण अमुल्य जाणे आमुचे
शहिद होऊन मरण्याला
*
मातीच्या ओढीने येत होतो
गाव मला तवा विसरभोळा
शहिद माझ्या होण्याचा
सन्माननीय हा मरण-सोहळा
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




