श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ शब्दसरिता… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
मनातल्या वेदनांना न ठावे
अश्रुंना अक्षरांचेच किनारे
शब्दभाव नभरात्रीचे तारे
स्पंदनांच्या लहरी प्रवाहात
जीवनाचा निवांत स्मृतीप्रांत
किती प्रीय भासे तरी एकांत
विरल्या क्षणांचे कवण शांत
चंद्रप्रतिमा साकारावी खास
आसुसलेले प्रतिभेचे श्वास
पौर्णिमेचा प्रकाश तो उदास
हाकते कल्पीत धोटी मंद-मंद
हलके स्वप्न ओहोटी प्रेम छंद
दुःखास सांत्वने विरह आनंद
तेच गान स्फुरावे जपूनी बंध.
नेत्रातले भास काजवे ओळी
सत्य कधीचे मांडते काव्य वेळी
जणू पांघरुनी शृंगारली कळी
सुखांनी भारली कविता ओंजळी.
गीतप्रहर मैफल जी रंगता
प्रेम कौतुकावे शब्दात झिंगता
कवण हृदयी ती प्रीत भंगता.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





