सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ घळ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
विरळ झाडीतून पुढे जाणारी ती घळ
फार सजीव भासत होती खरी,
झाडांची कमतरता सोडली तरी
वाटत होती ती खूप भारी.
*
पाण्याचा स्रोत काही अंशी हजर होता ;
म्हणून की काय पक्ष्यांचा तिथे वावर होता.
संध्याकाळमुळे काळोखात ती बुडत होती,
असले असे तरी इतरांना ती निरखीत होती.
*
पडलेल्या संध्येच्या लालीमेत ती
आणखीन खुलून दिसत होती.
लुप्त होऊ पहात असलेली ती
पाहत राहावी अशी वाटत होती.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



