श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ फाल्गुनी पंढरी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

फाल्गुन प्रारंभ वसंत स्वागत

कोकीळ स्वरात अभंगराग.

*

सर्वत्र बहार संतांची पंढरी

शोभती सुंदरी चंद्रभागाही.

*

विठ्ठल ऊभाची विश्वाचे अंतरी

नामाची जंतरी भक्ताकृपेस.

*

पाखरे नभात कालव गजर

पंढरी नजर स्वर्ग भुवरी.

*

पालवी फुलवा मानवा सुखांत

विठ्ठल एकांत भेटे अभंगी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments