श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मनाला… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मोजके बोलणे भावते मनाला

शांतता नेमकी भेटते मनाला

 *

सोहळा केवढा वाटतो सुखाचा

प्रार्थना ईश्वरी सांगते मनाला

 *

साधना साधता बातमी  कळावी

देवता कोणती पावते मनाला

 *

नेहमी हासणे वाजवी कशाला

 लाजरे वागणे जिंकते मनाला

 *

कोणत्या बंधनी बांधता कुणाला

मुक्तता संपणे बोचते मनाला

 *

शेवटी सांगणे चांगले असावे

आपदा संपली वाटते मनाला

 *

वासना आंधळी पाहते जगाला

वैभवी लोळणे मागते मनाला

 *

कायदा सारखा मागतो पुरावा

साक्ष खोटी किती झोंबते मनाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments