सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “आरसा” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
आरसा नसे कुणाचा नव्हता कधीच भाट
जे सत्य तेच सांगे दावी उगा न थाट
*
परी जत्रेत पाहिले मी तो वेगळेच दावी
अन पहावयास त्यातगर्दी अफाट होई
*
सत्य जाणून सुद्धा हौस खोटे पहाणे
काय माणसाना म्हणावे वेडे म्हणू कि शहाणे
*
अलिकडेच माणसाना सवयी अशाच जडल्या
सत्यास पाठ मात्र आभास ह्रदयास भिडला
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





