श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रश्न छळवादी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

आणि तसाही अर्थ नव्हता

विचारण्याला प्रश्न माझ्या.

गांभीर्यही नव्हते अपेक्षित

असंबद्ध उत्तराचे तुझ्या.

*

विसरुन जा म्हणण्याआधी

विसरलीस ना तू मला.

विसरणे विसरुन गेलो

विसरले मी जसा मला.

*

अनुत्तरित प्रश्न माझे

प्रश्न अजूनही पडती मला.

घेउनी गेलीस प्रश्न माझे

ठेऊन उत्तराचे ओझे मला.

*

पाठ करुन निघून गेली

अतर्क्य उत्तरे सारी मला.

पुनःपुन्हा परत सामोरी

छळवादी प्रश्न येती मला.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments