श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गूढ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मानवतेवर देवदयेची

अखंडअविरत पाखरं असते

भूतदयेच्या ओलाव्याने

खडतर जीवन हिरवळ बनते

*

देह मानवी भाड्याचे घर

परमात्म्याला कायम जपते

जन्ममरण हे कालचक्र पण

गरगर भरभर फिरत राहते

*

आळवावरचा थेंब दवाचा

होऊन होती खूप चमकते

रविकिरणांच्या सहवासाने

त्यांचे सुध्दा भाग्य उजळते

*

दिल्या घेतल्या शब्दांनी तर

चराचरांशी जुळते नाते

वचनपूर्तीच्या आत्मसुखाला

ऐश्वर्याचे कोंदण मिळते

*

काय कमावले काय हरवले

स्वार्थी मन हे गणित करते

मोक्षा दरी उभे राहुनी

परमेशाला दान मागते

*

अवकाशाचे गूढ कळेना

कुठली शक्ती इथे नांदते

येता जाता शोधा थोडे

हेच चिरंतन विश्व सांगते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments