श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ मन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
नि:संग हो मना
करूनी साधना।।
संग तो विषयांचा
संग तो अशाश्वताचा
शाश्ववताचा लळा
लाव रे मना…
नि:संग…
सांडी रे मोह-माया
नश्वर देह ही काया
नाम जप जपाया
गोडी लावी ये मना..
नि:संग…
हे चपल मना
जरा शांत बस ना
मर्कट लिला थांबवं ना
तुज मुळे फे-यात अडकेल ना..
नि:संग…
बघ ना मना
तुझिया नामातच
सार आहे कलीयुगेचे
उद्धरण्या जना..
नि:संग…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



