स्वाती विकास गाडेकर
कवितेचा उत्सव
☆ पंचतत्वांचे स्वत्व... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆
☆
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश…
निसर्ग निर्मिती चे, मूलभूत घटक खास!!
*
पृथ्वी वरील, मानव-प्राणी जात…
जीवन जगतात, पंचतत्वांची मिळता साथ!!
*
जलाशिवाय काहीच नसे, साध्य ह्या जीवाला…
अमृताची स्वर्गीय, उपमा मिळाली तयाला!!
*
अग्नीचा दाह, सहन करता…
कळते तयाला, हिम नगाची पूर्तता!!
*
वायू ची तर, किती ही गुणवत्ता…
तयामुळे उष्णतेचा दाह, सुसह्य होतसे पाहता पाहता!!
*
आकाशाची ती, कोमल दुलई…
जन्मदात्रीची जणू, प्रेमळ ऊब देई!!
*
नद्या, नाले, पक्षी, गिरी, शिखर…
निसर्गाची असे, निर्मिती थोर!!
*
कुठे असे, नद्यांचा खळखळाट…
तर कुठे असे, पर्णांचा सळसळाट!!
*
कुठे दिसे, रत्नाकराचे रौद्र रूप आणि हृदन…
कुठे ऐकू येई, पक्ष्यांचे मधुर कूजन!!
*
राजा आणिक रंक, भेद नसे निसर्गास…
मनुष्य अन् प्राणी, एकच भासे तयास!!
*
उपभोग घ्या ह्या, सुंदर निसर्ग निर्मितीचा…
भाग्य थोर म्हणून जाहलो, अंश ह्या सुंदर रचनेचा!!
☆
© स्वाती विकास गाडेकर
ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ मो ९८३३७००५७१
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





