ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ कसे जगावे☆ ज्योती कुळकर्णी ☆  

हाती आल्या क्षणांस पकडत जगून घ्यावे थोडे

नशिबामधले ताट सुखाने हसून खावे थोडे

 *

कसे नेहमी सावध राहू? कधी वहावत जावे!

कुठलीही का नशा असेना झिंगत जावे थोडे

 *

भांडण त्यांचे दोघांचे पण मला ओढले त्यांनी

इच्छा नसता मला लागले उगा लढावे थोडे

 *

कोसो होते दूर दु:खही म्हणून होते शीतल!

परदु:खाची जाण असावी, कढ सोसावे थोडे

 *

मूठ झाकली अज्ञानाची नको उघडुनी दावू

जाणत नसतो, जेव्हा उत्तर, गप्प बसावे थोडे

 *

रहाटगाडा फिरत राहतो कृपा कुणाची आहे?

समाजसेवक निरपेक्षपणे झटत असावे थोडे

 *

किती करावे! अजून कौतुक, बाई आहे म्हणुनी

संघर्षाचा वसा घेउनी सिद्ध करावे थोडे

©  ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted