श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ – जीवन नित्य विजय – ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
जीवनात काही हरवत नाही
जीवन हरणे गिरवत नाही
जगण्यास मार्ग अनेक असती
कधी कुणी मनी ठरवत नाही.
*
वर्तमानाला सामोरे जावे नित्य
नशीब केंव्हा अहं मिरवत नाही
अट्टाहास निराशा पसरवी भाव
आनंद कुणा दुःख भरवत नाही.
*
क्षितीजा गवसनी स्वप्ने स्वाभाविक
अपयश प्रयत्ना जीरवत नाही
कितीही दुरचा रस्ता ध्येयासाठी
कापत जाता, जिद्द हरवत नाही.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





