श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३३ ?

☆ माळी हुशार झाला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

चाहूल लागल्यावर तो तर पसार झाला

दारात लेक होती माळी हुशार झाला

*

दारावरून माझ्या गेली वरात होती

ह्या काळजात माझ्या गलका चिकार झाला

*

मीही खुशीत होतो नोटा खिशात होत्या

मी घाम गाळला अन् पहिला पगार झाला

*

पैसा खिशात होता गेलो नको तिथे मी

माझे नशीब खोटे भलता विकार झाला

*

गम्मत म्हणून सुद्धा खेळू नकाच पत्ते

झालोय मी भिकारी मोठा जुगार झाला

*

विसरून दुःख जाण्या मदिरा बरी म्हणालो

झाला उशीर थोडा अन् बंद बार झाला

*

ते गुंड लोक होते त्या सावलीत रमला

एका चुकीमुळे बघ तो हद्दपार झाला

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted