श्री तुकाराम दादा पाटील

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सूर ही बदलू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(वृत्त — भुवन सुंदर, १४ किंवा १५ मात्रा, (उ +प) (४, , +८))

लाजणे सोडून देवू

आणखी राबून खावू

 

सूर ही बदलू जरासे

गीत पण साथीत गावू

 

ओढता मागे कशाला

मिसळुनी गर्दीत जावू

 

थांबने जमणार नाही

भाकरी कमवून दावू

 

बेगडी झाला जमाना,

ढकलुनी बाजूस लावू

 

आत्मरंगी रंगताना

निवडल्या रंगात न्हावू

 

पोरकी झालीत पोरे

तेवढी पदरात घेवू

 

रांधणे झालेच आहे

पंगती मांडून जेवू

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted