श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ अपेक्षा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
मेघ होउन नाही
निदान वारा होउन ये.
अाकाशा खाली माझ्या
पाऊस घेउन ये.
पौर्णिमा होउन नाही
निदान काैमुदी होउन ये.
खिडकीतून घराच्या
चंद्र घेउन ये.
वृक्ष म्हणून नको
निदान पक्षी होउन ये.
चैत्रातल्या पालवीची
गाणी घेउन ये.
वास्तवात नकोच
निदान स्वप्न होउन ये.
रणरणत्या वाळवंटी
मृगजळ घेउन ये.
मीरा म्हणून नको
निदान राधा होउन ये.
सर्जनशील प्रेमाची
बासरी घेउन ये.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





