श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

स्वप्नातले मी घरकुल☆ श्री शरद कुलकर्णी ☆

स्पर्शून अभावित गेली

तीही नकार लाट होती.

गावून आवर्जून गेली

तीही माझीच गाज होती.

आजमितीस तुझ्याचसाठी

होईन मी समुद्र.

उसळून लाटलाट

फेसाळून आर्त अ‍ार्द्र.

गेलीस पुसून अलगद

रेतीवरील जे रमल.

बांधीन पुन्हा विश्वासाने

स्वप्नातले मी घरकुल.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted