श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मानवी जीवन… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

दिव्य सारासार

प्रमाण विचार

कर्तव्य कठोर

मनाचा निर्धार

शब्द सर्वेश्वर

धैर्य निर्विकार

गाठण्या तत्पर

यशाचे शिखर

* 

नित्य नवा भाव

लाघवी स्वभाव

वर्तनात साव

क्रोधाचा अभाव

अंतरीचा ठाव

निर्मितीला वाव

चिंतनाची हाव

प्रपंचाची नाव

* 

सुखंसमाधान

ईश्वरी चरण

नको निरुपण

अन्यही कारण

ध्येयाचे इंधन

जपे स्वाभिमान

निर्मळ पावन

मानवी जीवन

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी.
0

तुकाराम सर,खूप छान कविता, नेहमी प्रमाणेच