श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ चला हे ही बरेच झाले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
ओळखलेस नाही मजला
चला हेही बरे झाले.
पाठमोरी झालीस अलगद
चला हेही बरे झाले.
लपवलेस थेंब अनावर
चला हेही बरे झाले.
पाऊसही आला अचानक
चला हेही बरे झाले.
स्वप्नातले वास्तव समजले
चला हेही बरे झाले.
वास्तवातले स्वप्न कळाले
चला हेही बरे झाले.
पानगळीचे ऋतू उमजले
चला हेही बरे झाले.
आणि डोळे स्वच्छ झाले
चला हेही बरेच झाले.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




