श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ झाड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
मन छान आशावादी त्याला मातीत पेरावे
वाढण्याला भविष्यात रान ओलिताचे हवे
ऊन पाऊस झेलतं वाढ अंकुराची व्हावी
झाड ताडमाड होता सावलीला त्याच्या जावे
*
माणसाने माणसाला झाडा सारखे जपावे
खतं संस्काराचे त्याला वेळोवेळी देत जावे
संसाराच्या अंगणात झाड होईल आधार
कल्पतरू सम त्याला वैभव लाभावे
*
मुळे रोवून मातीत झाड उंच उंच व्हावे
झाड दैवत घराचे ऋषितुल्य होत जावे
साधूसंता प्रमाणेच त्यांची लाभावी सवली
उपकार करणारे झाड सोन्याचे वाटावे
*
मुळ पुरुष घराचा मग झाडाने बनावे
सांभाळाया कुटुंबाला आयुष्याचे दान द्यावे
फुले फळे वाटताना झाड हसावे डोलावे
झाड रूप माणसाचे त्याला अखंड पुजावे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




