डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ नाश अस्तित्वाचा… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला
मानवाच्या अस्तित्वाला घोर लागला ||ध्रु||
*
पोसुनिया उदरात
नवमासाचे ते व्रत
नाही क्लेषा जुमानत
जन्म द्यायला उद्युक्त
जाण तिच्या त्यागाची परी विसरला
गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला ||१||
*
संस्काराने मढविले
बाळकडू त्याला दिधले
वक्षामृत ही पाजले
रात्रंदिन जोपासले
घोट तरी तिच्या जीवाचा हो घेतला
गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला ||२||
*
शौर्याने देशा राखले
विज्ञाने-ज्ञाने उजळले
कर्तृत्वाचे पंख फुटले
अबला तिजला दुषायाला तो धजावला
गर्भस्थ गर्भाशयाचा अंत जाहला ||३||
(निशिगंध)
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





