श्री प्रमोद वामन वर्तक
☆ तुळस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
हिरवे काळे कुळ माझे
औषधी गुणांनी युक्त,
एक पान खा सकाळी
कफा पासून व्हा मुक्त!
*
फुलांस म्हणती मंजिरी
त्यात लपती माझ्या बिया,
येतील उपयोगी तुमच्या
नवीन रोपटे रुजवावया!
*
जगी खास वनस्पती
मलाच विवाहाचा मान,
पूजेत सत्यनारायणाच्या
वाहतात सहस्त्र पानं!
*
शोभा वाढवी अंगणाची
घरा समोरच्या वृंदावनी,
सांज होता मज जवळी
दिवा लावती सुवासिनी!
*
वीस तास दिसातले
सोडते प्राणवायू हवेत,
लावून परिसरात रोपं
करा प्रदूषणावर मात!
करा प्रदूषणावर मात!
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






