श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
प्रेमसखा!
श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
रंगारी साऱ्या दुनियेचा
धरून बैसला कुंचला,
चितारी तन्मयतेने मग
हृदयी वसल्या राधेला!
*
कर्णफुले कानी दोन
प्रेम रंगात रंगवली,
नील कांती मुखावरची
खुलवी ओठांची लाली!
*
मुग्ध भाषा दो नयनांची
सौन्दर्य मुखाचे वाढवी,
बिंदीसवे कनक मुकुट
केशसंभार तो खुलवी!
*
प्रेम नजरेने बघता तिला
वाटे आत्ता जिवंत होईल,
दिसता प्रेमसखा सामोरी
मिठीत त्याच्या विरघळेल!
मिठीत त्याच्या विरघळेल!
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






