वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ब्रेकअप… ?  वर्षा बालगोपाल 

तरू हाच संकेताचा साक्षीचा

दोघांच्या प्रीत भेटीचा, मोक्याचा

तरू एकमेकांच्या आधाराने

दिल्या घेतल्या आणा भाकांचा॥

*

फुले रोमांच दो अंगावरती

स्पर्श सारेच बोलके होऊनी

फुले करती गंध पखरण

दोघांची असीम प्रिती बघुनी॥

*

वचन दिले वचन घेतले 

एकत्र यायचे फक्त बहाणे

वचन कोणाचेही नसे सत्य

बोलाच्याच कढी भाता प्रमाणे॥

*

पण केलेले कसे विसरले?

दोघांचे प्रेम बहरले होते

पण नियतीच्या मनी वेगळे

जुळणार नव्हते त्यांचे नाते॥

*

फूट फुटलेले प्रेमांकूर का

अवचित असे जळून गेले

फूट पडली दोन जीवांमधे

एकमेकांनाही नकोसे झाले॥

*

ब्रेक लावला नाही भावनांना

वहावत गेले ते दोघेजण

ब्रेक अप झाले त्यांच्या नात्याचे

आता वेगळ्या वाटा, दिशापण॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted