नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ सारे आहे गैर … ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
सत्यवान कापे
वड फांदी जेंव्हा
तुटूनिया फांदी
पडे खाली तेंव्हा!!
*
यमराज आले
नेण्या त्याचे प्राण
सावित्री आडवी
उभी राहे येऊन !!
*
तुटलेली फांदी
तिचे झाले काय ?
हळूहळू फांदी
होते मृतप्राय !!
*
मेलेल्या फांदीचे
पुजन करता
सावित्रीचे पुण्य
कसे येईल म्हणता !!
*
फांदी तोडोनिया
कुणी पुजन करता
व्रत केले यैसे
कसे येईल म्हणता !!
*
वृक्षाचा संहार
पुजा उपचार
कधी समजेल
सारे आहे गैर !!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈





