श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
घागर मे सागर… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
होते घनदाट तम हृदयी
तूवा लावली एक पणती,
तेजाचे कूपच निर्मिले
फाकली प्रभा ज्ञानप्रकाशाची…
*
जे जे अरुप होते
त्यासी देई आकार,
पंगू ही चढे गिरी
मूक ही करी उच्चार…
*
असीम तूझे प्रेम
नव्हता त्यास तीर
दूर मी जरी आहे
तरी अनुभवी कृपेचा पूर…
*
येता तपोवनी
मडके घेवून रिकामे,
सद्विचार, श्रद्धा
भरून माघारी जातसे…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







