नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ ही जणू स्वर्गाचीच वाट… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
नागमोडी ही सुंदर वाट
हिरव्या समृद्धीतुन जाते
डोंगरावरील धुक्यातुन
स्वर्गातच खचीत जाते!!
*
स्वर्गासुखाकडे जाता
डोळे भरून निसर्ग पाहू
आनंदी सुखी तृप्त मन
भारावलेले तसेच राहू!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






