श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
मी ओळखून आहे
श्री आशिष बिवलकर ☆
☆
पादून हासणे अन् हासून हे पादणे
मी ओळखून आहे, कोठूनचे चणे
*
नाकातल्या केसांना का त्रास व्हावा
जळताच वासांनी अन् उग्र असावा
हे प्रश्न जीवघेणे, स्मरती ते दुखणे
मी ओळखून आहे, कोठूनचे चणे
*
स्वार्थी मनुष्य असा त्याला कसे कळावे
नाकात वास ज्याच्या त्यालाच दुःख ठावे
चोरटा कटाक्ष खुळा, आम्हा कठीण जिणे
मी ओळखून आहे, कोठूनचे चणे
*
जाता समोरून दिवसा चमके तारा
क्लेशातूनी झुळूकांच्या दुर्गंधीत वारा
खात्रीत पादण्यांच्या संपती सारे वाटाणे
मी ओळखून आहे, कोठूनचे चणे
*
पादून हासणे अन् हसून हे पादणे
मी ओळखून आहे, हे कोठूनचे चणे
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






