नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ आणिक दिसला सूर्यच सन्मुख… ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
कातळाला मिळे
बजरंग मुख
आणिक दिसला
सूर्यच सन्मुख!!
*
उघडता मुख
आत जाई सूर्य
वाटते मनाला
सुखद आश्चर्य!!
*
आत जाता सूर्य
तेजोमय मुख
क्षणिक नजारा
देई मना सुख!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






