श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
सद्गुरू ॐ मालती आई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
तुझा शब्द की
थेंब ज्ञानामृताचा
तूझा स्पर्श असा की
सोने करी लोहाचा…
तूझ्या नजरेत
चमक वात्सल्याची,
वाणीत गोडवा की,
धार ती अमृताची..
राज्ञी तू ब्रह्मांडाची
ईश्वर तू देहधारी,
साष्टांग प्रणिपात
कृपे तुझिया पोहचे पैलतीरी…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





