संध्या बेडेकर

☆ “Financial Diarrhea..“ ☆ संध्या बेडेकर ☆

आज ऑफिस मध्ये अजय आला. मला थोड आश्चर्यच वाटल. तसा कधी येत नाही. घरी न येता ऑफिस मध्ये का आला असेल? असा पुसटचा विचार क्षणभरासाठी माझ्या मनात येऊन गेला. बरे असो.

मी रनरला चहा आणायला सांगीतला. चहा घेता घेता मी म्हंटल… सर्व ठीक ना.

अजय म्हणाला… नाही दादा… सर्व ठीक नाहिये. माझ्या कंपनीतून काही employees ना काढल,… त्यात माझ पण नाव आहे.

मी म्हटलं… अरे! ठीक आहे. तू एवढा शिकलेला आहेस, तेंव्हा मिळेल जाॅब एखादा. लागतील चार सहा महिने… त्या दरम्यान एखादा चांगला कोर्स करून घे. वेळ वाया जाणार नाही आणि तुझी value वाढेल. नंतरच्या जाॅब मध्ये पगारात जंप पण मिळेल. तुझ्याकडे इमर्जन्सी फंड असेलच, तुला चांगला पगार होता. या वर्ष दोन वर्ष भरापासून तर तू दोन लाख रुपए महिना कमवत होतास ना.

अरे! जाॅब बदलणे, नोकरी जाणे या गोष्टी आपल्या बरोबर कधीही होणार्या गोष्टी आहेत. ती टांगती तलवार तर सतत डोक्यावर असतेच. त्या साठी मनाची आणि पैशाची सोय करायचीच असते. ती सोय साधारण सहा आठ महिन्याचा पिरेड मनात ठेवून करतोच आपण. म्हणजे नोकरी नसताना घरखर्च चालेल एवढा.

ते इमरजंसी फंड या अशाच दिवसांसाठी असतात. मी पण प्रयत्न करतो. सांगतो माझ्या मित्रांना. Don’t worry..

अजय म्हणाला… दादा माझा पगार महिन्याच्या शेवटी संपतो. माझ्याकडे काही इमरजंसी फंड नाही.

आता मात्र दादाचा पारा चढला.

ऑफिस मध्ये उगीच या गोष्टी नकोत. म्हणून संध्याकाळी अनिताला घेऊन घरी ये. अस म्हणून दादाने अनिताला ( लहान बहीणीला) फोन केला.

कुठे आहेस? विचारले.

दादा अरे! आमच्या मैत्रीणिंचा get-together आहे. त्यानंतर shopping ला जाणार आहोत.

आज ऑफिस मधून कसा काय फोन केला रे दादा?

अग! सहजच केला. आज संध्याकाळी तुम्ही दोघ घरी या… दादा म्हणाला.

संध्याकाळी अनिता अजय आले. आल्या आल्या अनिताने दादा वहीनीला साडी दाखवली. साडी सुंदरच होती. किंमत पण भारी होती. सतरा हजार.

दादा म्हणाला… नवीन साडी घेतली. काही विशेष कारण?

अरे दादा! माझ्या मैत्रीणीच्या भावाचे लग्न आहे. म्हणून घेतली. नंतरच्या reception साठी पण घ्यायची आहे.

 वन्स! चार महिन्यापूर्वीच तर तुमच्या नणंदेचे लग्न झाल. तेंव्हा घेतल्या होत्या की साड्या तुम्ही.

अग! हो वहीनी, या लग्नात आणि reception ला आम्ही सर्व मैत्रीणींनी एकाच रंगाच्या साड्या निसायच ठरवलय. आणि त्या जून्या साड्यांचा फोटो फेस बुकवर आहे ना … म्हणून त्या नको. माझ्या मैत्रीणीच्या झाल्या घेऊन. माझच राहिलय. ड्रायव्हर चार दिवस सुट्टीवर होता न.

ड्राइवर ठेवलाय तुम्ही?

अजय तू तर बाईक वर जातोस ना ऑफिस मध्ये?

दादाने विचारले…

अरे दादा! मला बाहेर जायच असत ना.

अरे! आम्ही किटी पार्टी, birthday parties, anniversary बाहेरच हाॅटेलमध्ये करतो.

अच्छा अच्छा! अस आहे तर… दादा म्हणाला.

 अरे अजय!

 कालच Apple चे New iphone 18 pro, iphone 18 pro max launch झालेत. 1 st day फोन घ्यायला लांबलचक लाईन बघीतलीस का?

माझ्या दोन मैत्रीणींजवळ आहेत. लगेच अनिता म्हणाली.

 दादा आपल्या लहान बहिणीच्या घरातील वातावरणाचा एकंदर अंदाज लावत होता. पैशाचा अपव्यय त्याच्या लक्षात आला. बजेट नावाची काही गोष्ट त्यांच्या घरी नसावीच.

तेवढ्यात रमाने विजेचे बिल दादाच्या हातात देत म्हंटल… अहो! यावेळेस बिल खूप आलय. भरायच आहे.

अनिता तुमच किती येत ग बिल? दादाने विचारल…

मला नाही माहीत. ही सर्व काम अजय करतो.

म्हणतात ना…

जैसा संग… वैसा रंग.

दादाच्या लक्षात आल. मैत्रीणींच्या संगतीत, बडेजावपणा दाखवायची रेस सुरू आहे. विजेचे बिल किती येत? घर खर्चाला किती पैसे लागतात? Saving किती? हे माहितच नाही. म्हणजे बजेट बनविणे, त्यात अडी अडचणीला इमरजंसी फंड जवळ असावा हा विचारच नाही. ड्राइवर कशाला हवाय? ऑटोने cab ने जाता येत. म्हणजे पैसे कुठे कसे वाचू शकतात? याचा विचार मनातही येत नसावा.

 दादाच्या लक्षात आले… अनिताला FINANCIAL DIARRHEA झालाय. याचे निदान करावेच लागेल. औषध द्यावेच लागणार आहे.

दादा म्हणाला… अनिता आता घरखर्च आणि बाकी कामांची जबाबदारी तू घे. तुला माहित आहे ना अजयचा जाॅब गेलाय.

अरे दादा! मला नाही माहित. अनिता म्हणाली.

अग! आजच अजयला कळलय.

अजय आता नवीन जाॅब शोधायला सुरवात कर. हा experience कामी येईल. एखादा कोर्स कर. सध्या AI चे कोर्स करतायेत सगळे. पचवीस तीस हजार लागतील, पण पूढे फायदा होईल.

नवीन नोकरो लागेपर्यंत अनिता emergency fund वापर. सांभाळून खर्च कर.

अजय अरे! अनिता ला करू दे पैशाचा हिशोब. तू स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. मी पण प्रयत्न करतो. अनिताला बॅंकेचे सर्व डिटेल्स सांग.

दादा! बॅंकेत फक्त 20/25 हजार असतील… अजय म्हणाला.

मग अनिता नोकरी लागेपर्यंत आता खर्च कसा करणार?

दादाने अजयला मागच्या दोन महिन्याचे बॅंकेचे प्रिंट आउट्स मागितले.

अग अनिता! काय आहे हे? किती खर्च हा?

फंक्त shopping.

अरे दादा! मला माहित नाही पैशाचा हिशोब कसा मॅनेज करायचा?

अग! अनिता ठीक आहे, आतापर्यंत केला नाही, आता कर.

सध्या तू फक्त बेहिशोब खर्च करतेय.

अजयला किती पगार मिळतो ते तरी माहित आहे का तुला?

महिन्याला किती खर्च होतो? किती saving होत/ saving करता का?? हे माहित आहे का तुला? आता कमित कमी 6 महिने पगार येणार नाही.

अग! तू त्या मैत्रीणींच्या संगतीत स्वतःचा/ घरचा हिशोब करतच नाहीये. अग! साड्या, कपडे किती घ्यायचे?

आता आधी एक लिस्ट बनव. किती? कठे? कसा? खर्च कमी करता येईल? ते लिही. आणि सध्याच्या मैत्रीणींची संगत सोड अस मी म्हणणार नाही, पण त्यांच्या सारख वागायची, त्यांना फाॅलो करायची गरज नाही.

अग! संगत कोणाचीही असू दे, घडण बिघडण आपल्या हातात असत.

त्या mrs Gupta, तुझ्या मैत्रीणीच्या नवर्याला मी ओळखतो. मागच्या वर्षी लोन काढून युरोप ट्रीप ला गेले होते.

अग! स्वतःचे काही नियम असावेत ना.

आधी त्या credit card ला फेकून दे.

अग! पैसा नेहमी जवळ असावा.

इतक्यातलीच गोष्ट सांगतो…

मी एका ऑटोने येत होतो. सहज त्याला विचारल रोज किती कमवतोस?

तो म्हणाला… साहेब साधारण ₹1500. त्यातले ₹ 500 गॅस वर खर्च होतात. मी नेहमी हेच काम करणार. तेंव्हा मला असेच रोज पैसे मिळणार. घरी गेल्यावर मी बायकोच्या हातात सर्व पैसे देतो.

साहेब तिने 4 डबे केलेत. एक मुलांच्या फी चा, डोॅक्टर चा, एक इमरजंसी फंडचा, आणि एक जे महिन्याचे बिल्स द्यायचे असतात त्याचा. त्यात बहुतेक ₹ 100/150 टाकत असावी. आणि उरलेले पैसै ती घरखर्चाला वापरते. ती हे कस करते? मलाही आश्चर्यच वाटत.

त्यामुळे पैशाचा अपव्यय होत नाही हे नक्की. माझ्यापेक्षा तीच हे काम जास्त व्यवस्थीत करते.

अनिता! बघ असा पैसा सांभाळायचा किंवा वापरायचा असतो. आपला खर्चावर कंट्रोल रहात नसेल तर सरळ दुसर्याच्या हातात पैशाचा कारभार द्यावा.

 अनिता! आजपर्यंत अजयच्या दोन लाख पगाराच्या धुंदीत होती. Income आणि खर्च याच गणित तिने कधी मांडलच नाही. आज प्रथमच एका ऑटोवाल्याच्या बायकोने तिला चांगली समज दिली.

पैशाचा अंधाधुंद खर्च ही एक मानसिक बिमारी आहे. ही चटक / सवय आहे. जेवढ आपल्याकडे नाही, त्यापेक्षा जास्त दाखवण… या अशा वागण्याचा परिणाम म्हणजे भोवर्‍यात अडकणे आहे.

अनिताला रडताना बघून… दादा म्हणाला…

अग!

संकट हे पाण्यासारख असत ते तुम्हाला बुडवायला येत नाही ते पोहायला शिकवत.

प्रत्येक वेळेस आपल्या समोर पर्याय असतात. आपल्या मनात त्याबाबत विचारही येतात, पण मन जर ताब्यात नसेल तर आपण चूकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. निर्णय घेण्या आधी दहा मिनिटे विचार केला तर मनाला ताब्यात ठेवता येईल.

वस्तू घेण्याआधी या वस्तूची आपल्याला खरच गरज आहे का? हा विचार एकदा नाही चारदा करावा.

काळजी करू नको, मी आहे. सगळ्यात आधी ते क्रेडीट कार्ड फाडून फेक.

यापूढे अस वागायच नाही.

अजय! तू खर्चाचा हिशोब तुझ्या हातात ठेव.

म्हणतात ना…

समय को समझ कर, समयपर, संभल जाना ही जीवन जीने का गुरूमंत्र है।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted