मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघी… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दोघी… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

शेणाचा सडा मंदिरासमोर टाकून आजी आत आली. “रांगोळी काढते का ग मने.. ? अशी हाक मारून आजीने चुलीतलं लाकूड जरा हलवलं आणि चहाचं आधण ठेवलं…

मनी लाल जास्वंदाचे फुलं तोडीत होती… आजीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, “काढते ना आजी माय… एक एक काम होऊ दे की… “

आजीने चहा गाळला आणि मनीकडे घेऊन आली.. मनीने हार गुंफायला सुरुवात केली होती… आजीने तिला चहा दिला आणि प्रेमानं तिच्या तोंडावरून बोटं फिरवून कडकड आपल्या कपाळावर मोडली. “बघ किती माया हाय तुझ्यावर… “

तशी मनी गहिवरून म्हटली, “तू माया करणारी होतीस म्हणून तर जगले ना ग या कठीण आयुष्यात, नाहीतर कधीच सम्पलं होतं आयुष्य… “

आजी म्हणाली, “आयुष्य संपणं आपल्या हातात असतं तर मी मेली म्हातारी कशाला जगत बसले असते.. ? अगं आयुष्य एवढं सहज नसतं संपत. मग ते आहे तेवढं हिमतीने मात्र जगावं आणि ते ही स्वतःच्या कर्तुत्वावर…

मने तुझी आई लवकर गेली पण तुझ्याकडे पाहून मी जगले… तुझा बाप आणि आजा अपघातात गेल्यावर तर वाटलं… आता आपण हाताने आयुष्य थांबवावं आपलं, पण तेंव्हा ह्या मंदिरातल्या पुजारीन बाईनं आधार मागितला, म्हणाली, “ह्या दुर्गेच्या पायी सेवेला राहा… नातीला शाळेत घालू आणि आपण सेवा करू एकमेकिंचा आधार होऊन… तिने परत जगण्याला दिशा दिली…

तू शिकली, लग्न केलं पण तुझं दुर्दैव, लोकं त्रास देणारे भेटले, तुला घरात कोंडून मारणारे, पण म्हणून अश्या लोकांसाठी आपला जीव देणं हा मार्ग असतो का ग? आयुष्य सम्पवण्याचा,.. ?

तू त्यादिवशी जर रेल्वेखाली सापडली असती ना मने, मग ह्या आजीने आयुष्य खुप दुःखात काढलं असतं… तेंव्हा मला वाटलं असतं… जगण्याचं, विचारांचं बळ मी तुला द्यायला विसरले…

तुझ्यासारखी खुप शाळेत गेले नसले तरी… ह्या पुजारीबाईनं वाचायला शिकवून मला पुस्तकं वाचायला शिकवली… त्यांच्या कपाटातली सगळी पुस्तकं वाचली मी तू लग्न करून गेल्यावर ह्या पाच वर्षात..

पुजारी बाई गेल्या तेंव्हा मला जवळ बोलवून म्हंटल्या होत्या, ‘मावशी, स्त्रीला कस्पटासमान समजणाऱ्या ह्या समाजात आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असतं… शरीर जपायचं असतं आणि स्वबळावर उभं राहायचं असतं… हे जमलं ना मग स्त्री टिकली…

स्वतःचं अस्तित्व ह्या दुर्गेने त्या काळात टिकवलं त्या महिषासुराला पायाशी लोळवून.. ह्या काळातही वासनेचे, अहंकाराचे, दुष्ट विचारांचे महिषासुर आहेत, त्यांचा वध करून सन्मानाने जगणं यावं स्त्रियांना हेच वाटतं मला, म्हणून तेंव्हा नवऱ्याने मुल होत नाही म्हणून टाकून दिली तरी ह्या दुर्गेने वाचवलं मला… स्त्रीशक्तीचं हे नातं ह्या संदेशातून जपत चला… ‘

पुजारीन बाई गेली पण मला उभं करून गेली… म्हणून तर तू रेल्वेखाली सापडली असती तर पुजारीन बाईने स्वर्गातून नक्कीच दुःख व्यक्त केलं असतं, नाती पर्यंतही माझा संदेश पोहचवला नाही म्हणून.. “

मनी म्हणाली, “आजी तू ह्या नातीला आज काय दिलंस हे मी शब्दात सांगू शकत नाही, पण एक मात्र खरं.. पैसा, दागदागिने ह्यापेक्षा खुप मौल्यवान असं विचारांचं बीज तू माझ्यात पेरलं… आजपासून सुरू होणारी ही नवरात्री माझ्या आयुष्यातील नवी सुरुवात असेल… ” एवढं बोलून मनी रांगोळी काढायला गेली…

मंदिरातली नवदुर्गेची मूर्ती आज अधिकच प्रसन्न भासत होती… महिषासुराचा वध करण्याचा खरा हेतू स्त्रीशक्तीत असाच पेरला जावो असा आशिर्वाद देण्या ती मंद हास्य करत उभी होती…

आजी मात्र नातीच्या रांगोळीत भरले जाणारे रंग कुतूहलाने बघत होती आणि मनात म्हणत होती.

“प्रसंग येवो किती कठिणही

स्त्रीशक्ती तू उभी राहा,..

एकमेकांना साथ देऊ हा

जगण्याचा वसा घेत राहा.. “

☆

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कडकलक्ष्मी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “कडकलक्ष्मी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

स्मिताचा वरच्या पट्टीतला आवाज, आजपर्यंत कुणी ऐकला नव्हता.

तिचा स्वभावच होता तसा.

आवाज चढला की आपला तोल ढासळतो, स्मिताचं स्पष्ट मत.

समोरचा कसाही वागू देत.

आपला तोल ढासळता कामा नये.

न ओरडताही आपला संताप, समोरच्यापर्यंत पोचवता येतो.

 स्मिताचं चॅनल म्युट झालं की, घराला समजायचं कुणी तरी चुकलंय.

मग तिचा नवरा रवी असो, नाहीतर छोटा आर्य.

जो चुकला असेल, तो पटकन् साॅरी म्हणायचा.

स्मिताच्या चेहर्यावरचं हासू परत यायचं.

अर्थात स्मिताच चुकली की…

बेझिझक माफी मागणार…

अगदी आर्यची सुद्धा.

… तुरंत.

वर निर्व्याज स्मितहास्याची पखरण…

ड्रायफ्रुट मस्तानीवर काजूपिस्त्यांची गर्दी झाल्यासारखं, गोऽऽड वाटायचं.

तिच्या त्या हसण्यावरच तर, रवि कुर्बान होता जिंदगीभर.

आॅफिसमधेही तसंच.

एकदा काम अंगावर घेतलं की, स्मिता ते काम पूर्ण करणारच.

अगदी एन्जाॅय करणार ते वर्कोहोल..

झिंग येईपर्यंत…

पण जे शक्य नाही, ते हसून नाही म्हणणार.

नाही म्हणजे नाही.

का. द. रे…

थोडक्यात आॅफिस स्मितावर डिपेंडन्ट, पण स्मिता फुल्ली ईन्डीपेन्डन्ट.

स्मिता तिच्या नावसारखं जगत होती.

नावाला जागत होती.

सुहास्याची ऊधळण करीत…

नवरात्र तिच्याही घरी असायचं.

स्मिताची भक्तीची कन्सेप्ट एकदम क्लिअर होती.

तिच्यामते ‘श्रद्धा’ ही तिच्या जगण्याचं टाॅनिक होतं.

तिच्या आयुष्याचं हाॅर्लिक्स.

उतू नये.. मातू नये…

देवीपुढे नतमस्तक व्हावं..

अर्थात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची गल्लत होवू न देता.

गेला आठवडाभर आॅफिसात ती रोज एक तास जास्त थांबायची..

आज हाफ डे टाकून, इथं देवीच्या मंदिरात..

प्रचंड लाईन…

रेटारेटी.. आरडाओरडा सगळंच.

रवी म्हणायचा तिला, ‘एरवी वर्षभर मंदिर रिकामंच असतं की..

 मग एवढ्या गर्दीत नवरात्रात जायचं काय अडलंय? ‘

” देवीच्या चेहर्यावरचं तेज बघायचं या दिवसात…

वर्षभर लढण्याचं बळ देतं ते मला.. “

रवी हसून गप्प बसायचा.

आख्खं गाव ऊभं होतं लाईनीत.

लेकुरवाळ्या, म्हातार्या, कुमारिका सगळ्या..

जवळजवळ तेवढीच पुरूषमंडळी..

तिच्यापुढेच एक घुंघटवाली.

कडेवर एक.

हातात दुसरं…

स्मिताला त्या बाईची धांदल बघवेना.

तिनं त्या घुंघटवालीकडे नेहमीसारखं हसून बघितलं आणि तिच्या मोठ्या पोराचा हात हातात घट्ट पकडला.

घुंघटवालीनं तिचं स्माईल इंटरेस्टसकट परत केलं.

दीड तास होवून गेला..

मुंगीसारखी लाईन टुकुर टुकुर पुढे सरकत होती..

होता होता स्मिता सभामंडपापाशी पोचली..

अचानक..

लाईन तुटली..

मोत्यांची माळ मध्येच तुटावी तशी..

कोणीतरी नगरसेवक..

त्याची खासमखास मंडळी..

स्वतः पुजारी त्यांना रिसीव्ह करायला बाहेर आलेला.

बिनदिक्कत ही मंडळी दर्शनरांग न जुमानता आत घुसत होती.

रांग हतबल.

मूक.. मजबूर.. लाचार.

स्मिता मात्र प्रचंड अस्वस्थ..

युनिसेल्युलर अमिबासारखं, तिला आपलं अस्तित्व शून्य वाटलं.

क्षणभरच..

ज्वालामुखीचा ऊद्रेक झाला.

ती मोठ्यांदा ओरडली.

थांबा…

“पुजारीबुवा, मला वाटलं तुम्ही फक्त देवीची सेवा करता..

तुम्ही तर..

असं करा, देवीची ऊत्सवमूर्तीच बाहेर घेवून या.

साहेबांना त्रास कशाला.??

नाहीतरी रोज संध्याकाळी मंदिराभोवती पालखी मिरवणूक निघतेच, आज सकाळीच पालखी फिरवू… “

सीधी बात, नो बकवास.

रांग बघतच राहिली.

व्ही. आय. पी. मंडळी शाॅकमध्ये.

स्मिताचा तो आवेश..

आवाजातली ती जरब..

अंगारी डोळे…

साक्षात ‘कडक’लक्ष्मी.

असहणेबल कडकड.

स्मिताचा हा अवतार जगाला सरप्राईजच होता.

त्या गोतावळ्यात एक मध्यमवयीन सूज्ञ होता..

शब्दांचा मार सहन न करू शकणारा.

तो ओशाळला..

व्ही. आय. पी. मंडळीना हाताला धरून त्याने काढता पाय घेतला.

पुजारीबुवाही गर्दीत लपाछपी खेळत देवीला शरण गेले..

 गर्दी मात्र ‘कडकलक्ष्मी’च्या दर्शनाने अचंबीत.

टाळ्यांचा गजर झाला.

ऊदो ऊदोचा जागर करीत दर्शनरांग पुन्हा पुढे सरकू लागली..

 

कडकलक्ष्मी की जय! 

 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तूच माझी दुर्गा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “तूच माझी दुर्गा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

हॉलमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांची व्हीलचेअरवरचा सुधीर अगत्यानं विचारपूस करत होता.

काही वेळात सुधीरची बायको रोहिणी आणि मुलगी सई आल्या. सर्वांनी टाळयांच्या गजरात दोघींचे स्वागत केलं.

सर्वांना पाहून रोहिणीला आश्चर्याचा धक्का बसला.

“आई, कसं वाटलं सरप्राइज?” सईनं विचारलं.

“अहो, हे काय?”

“तुझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन.. ”… सुधीर 

“याची गरज नव्हती. उगीचच खर्च!!” … रोहिणी.

“वाढदिवस फक्त निमित्त आहे.” … सुधीर.

“पण.. कशासाठी?”

“आज पैशाचा विचार नको. हे सगळे जीवाभावाचे आहेत. ज्यांनी आपल्याला कठीण काळात साथ दिली. आधार दिला, मदत केली. त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून आजची पार्टी…”

“सईनं आग्रह करून सिनेमाला का नेलं ते आता लक्षात आलं.”… रोहिणीच्या बोलण्यावर सगळे मोठ्यानं हसले.

“अनपेक्षितपणे मिळालेले हे अत्यानदांचे क्षण फार मोलाचे आहेत. आता नेमकं काय वाटतंय हे सांगता येणार नाही पण छान!! सरप्राईज आवडलं. खूप खूप धन्यवाद!!” … रोहिणीनं हात जोडले.

“आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आभार!! खरं सांगायचं तर रोहिणीच्या वाढदिवस हे निमित्त.. खरंतर हा कार्यक्रम माझ्या पुनर्जन्माचा आहे.” … सुधीर.

“अहो, काहीही काय बोलताय?” … रोहिणी.

“आज बोलू दे… पाच वर्षांपूर्वी झालेल्या जीवघेण्या अक्सीडेंटमध्ये जीव वाचला पण आयुष्य पार बदललं.

हॉस्पिटलमधले दहा महीने फार भयंकर होते. वेगवेगळी ऑपरेशन्स करूनही तब्येतीत सुधारणा होत नव्हती. एकातून बरा झालो की दुसरं दुखणं सुरू व्हायचं. दवाखाना, बेड, औषधं, इंजेक्शन, डॉक्टर, नर्स, ही व्हील चेअर… एवढ्याच गोष्टी आयुष्यात राहिल्या. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आलो तेव्हा रोहिणी, सईची ओढाताण बघवत नव्हती… अनेकदा वाटायचं की गेलो असतो तर बरं झालं असतं. निदान दोघींचे हाल वाचले असते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. सगळी बचत संपली. डोक्यावर कर्ज झालं. राहतं घर सोडलं तर काहीही शिल्लक राहीलं नाही. जवळचे म्हणवणारे नातेवाईक, मित्र प्रत्यक्षात खूप लांब असतात हे संकटाच्या वेळीच लक्षात येतं. असो. रोहिणीनं एकटीने मॅनेज केलं.”

“अहो, स्वतःला आवरा. बास!! आता नको तो विषय.”

.. “रोहिणीची धावपळ, टेंशन सगळं समजत होतं. स्वतःच्या हतबलतेचा खूप राग यायचा. शांतपणे ती परिस्थितीचा सामना करत होती आणि मी निराशेपोटी आत्महत्येचा विचार करत होतो. माझा स्वभाव तापट, पटकन संतापतो. आजारपणात चिडण्याचं प्रमाण वाढलं. सगळा राग रोहिणीवर निघायचा. सतत चिडचिड, नाहीतर एकदम गप्प बसणं, मध्येच रडणं असं माझं चाललेलं.. हे सगळं सहन करत रोहिणीनं मला सावरलं. काळजी घेतली. घर, नोकरी, मुलीचं शिक्षण आणि परावलंबी नवरा अशा वेगवेगळ्या फ्रंटवर एकटी लढली आणि अजूनही ती लढाई चालूयं.” … खूप भरून आल्यानं सुधीर बोलायचं थांबला.

“अहो, आता पुरे झालं. जेवायला चला. सगळे खोळंबलेत”… रोहिणी.

“तुझ्या कष्टाची पुरेपूर जाणीव आहे. जाहीरपणे सांगतो की तूच माझ्या असण्याचं कारण. तूच सरस्वती, तूच सावित्री अन तूच माझी दुर्गा!! ” 

भावूक झालेल्या रोहिणीनं सुधीरचा हात हातात घेतला. तितक्यात सई केक घेऊन आली. तो कापल्यानंतर लखलखत्या पन्नास दिव्यांनी रोहिणीचं औक्षण केलं गेलं. बायकोला ओवाळताना सुधीर म्हणाला.. “शतायुषी हो!!, या जन्मात जमलं नाही पण पुढच्या जन्मात तुला खूप सुखात ठेवीन. यापुढं वटसावित्रीची पूजा आपण जोडीनं करायची.”

…. भरल्या डोळ्यांनी सुधीर म्हणाला तेव्हा रोहिणीचा बांध फुटला.. सई आई-बाबांना घट्ट बिलगली.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग २ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग २ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

☆☆☆☆

(दिवे झगमगू लागले होते. काही पुरुष मंडळी खाण्या-पिण्याची मजा घेत होते. आया आपल्या मुलांना घेऊन निघून गेल्या होत्या. झोपाळे आता रिकामेच झुलत होते. त्यांचं किलबिलणं अजूनही हवेत गुंजत होतं. ती निघाली.) इथून पुढे – –

अभिजीतला ती प्रथम कधी भेटली होती बरं? कॉलेज-कॅंटीनमधेच. समुद्रकिनारी एक शहाळ्यात दोन स्ट्रॉ घालून आणी पिणं. नारळवाला तेव्हा हसला होता. त्यावेळी मोबाइल नव्हते. पण या स्मृतींच्या आल्बममध्ये किती सुंदर फोटो होते. तिथे जणू काळ थांबून राहिला होता. अभिजीतने उडवलेलं पाणी अजूनही तिला भिजवत राहिलं होतं॰ तिचं पहिलं चुंबन, सुंदर रंगी-बेरंगी फुलपाखरांप्रमाणे उडत उडत तिच्या कोमल ओठांवर अशा तर्‍हेने बसलं होतं, की तिचे डोळेच बंद झाले. देहात एका मधुर शिरशिरीचा तिला अनुभव येत राहिला. डेथ क्लिनिंगची पहिली अट हीच आहे की डेथ इज़ अ सेलिब्रेशन ऑफ लाइफ! रिकाम्या बाकावर पटकन काही तरी ठेवून निघावं, तशी ती लगेचच बागेतून बाहेर पडली आणि रेस्टॉरन्टमध्ये जेवून घरी परतली.

सकाळी बाल्कनीत चहा पिता पिता ती विचार करू लागली, ‘हा डिनर सेट मी कुणाला देऊ? कुणाला दिला आणि ते नको म्हणाले तर? आज-काल या क्रोकरीत काही नावीन्य राहिलेलं नाही. ’

डोअर बेल वाजली. आज वर्तमानपत्र उशिरा आली होती. दार उघडलं, तर शेजारच्या मालतीताई होत्या.

‘काल माझा वाढदिवस होता. मुलाने केक आणला. आता या वयात असला वाढदिवस म्हणजे… साठ वर्षं झाली. पण मुलं म्हणाली, ‘पार्टी करायचीच! ’ माझी बहीणही आणंदहून आली आहे. आपल्यालाही बोलावलं होतं, पण आपण बाहेर गेला होतात. केक जरूर खा… ‘

‘बाहेरूनच निघून जाणार? आत या ना! ’

‘पण मला स्वैपाक…

‘फार नाही. फक्त पाच मिनिटे… ‘

‘मालती आत आली. डायनिंग टेबलवर केक ठेवत म्हणाली,

 ‘नीलाताई आपल्या उंधियचा स्वाद अजून माझ्या जिभेवर आहे. ’

नीला लगेचच स्टुलावर चढली. कपाट उघडलं.

‘हा डिनर सेट आपण घेऊन जाल? ” आपल्या घरात तो उपयोगी पडेल, असं मला वाटतं.

मालतीला आश्चर्य वाटलं. ‘अरे, इतका सुंदर, डिसेंट डिनर सेट… ’

नीलाने एक प्लेट तिच्या हातात ठेवत म्हंटलं, फिक्या हिरव्या रंगावर पानांचं सुरेख डिझाईन. मालती पुन्हा पुन्हा बघू लागली.

‘पण खूप महाग असेल ना! मला इतका खर्च करणं अवघड आहे. ’

‘पैशाचा काही प्रश्नच नाही मालतीताई! हा आपल्यासाठी मुद्दाम खरेदी केलेला नाही. त्यामुळे याला वाढदिवसाची भेट असंही म्हणता येणार नाही. पण आपण जर याचा वापर केलात, तर मला खूप आनंद होईल. आपला परिवार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला याचा उपयोग होऊ शकेल! ’

मालतीला जरा संकोच वाटला. ‘पण असाच कसा घ्यायचा मी? ’

‘का नाही? मी आपल्याला हा सेट खुशीने देते आहे. अभिजीतसुद्धा जिथे असेल, तिथे खुश होईल! ’

मालती घाईघाईने निघाली. ‘ आपले खूप खूप आभार ताई. विनय लगेचच पळत येईल आणि घेऊन जाईल. ’

विनय खरोखरच पळत आला. ओठया उत्साहान वर चढला. ‘`लव यु आंटी! ’

म्हणत वर चढला. पिशवी भरली आणि ती घेऊन गेला.

त्यानंतर वेळ आली घरातल्या भांड्यांची. भाजी मार्केटच्या जवळ फुटपाथवर एक कुटुंब पालेभाज्या, फळभाज्या विकत होते. तिथल्याच झोपडीत रहात होते. एकत्र जेवण घेत होते. अ‍ॅल्युमिनीयमची मोडकी तोडकी भांडी, स्वस्त प्लेट्स तिने तिथे बघितल्या होत्या. दूधपाक, ऊंधियु या सारखे पदार्थ, ती ज्यात शिजवायची, ती पातेली मोठी मोठी होती. नंतर तिने चौकीदाराला बोलावले. एक मोठी थैली भरली. रिक्शा बाजारात गेली, त्यावेळी सगळीजण जेवणाच्या तयारीत होते. नीलाने मोठी थैली तिच्याजवळ ‘ही ठेवा’ म्हंटलं. ‘ घ्या. याचा उपयोग करा. वापरा. विकू नका. ’ कुटुंबातल्या बायकांनी थैली जवळ ठेवली, ‘आपण म्हणाल, त्याची शपथ घेऊन सांगते, हे आम्हाला सोन्या-रुप्यासारखं आहे. हे कसं विकू आम्ही. भांड्यांवाचून आमचं खूप अडत होतं.

सगळे तिच्या पाया पडू लागले. ती घाईघाईने तिथून निघाली. रात्री प्रियमला फ़ोन लावला. ‘ तुम्हा सगळ्यांची आज आठवण येतेय. याल ना? नाही… मी काही आजारी नाही. फक्त तुम्हा सर्वांना भेटावसं वाटतय. एवढंच! ’

निशांत-प्रियम दोनच दिवसात आली. ‘काय झालं आई? ’

नीलाने बंद असलेली बेडरूम उघडली. ‘ही तुमची खोली आहे. इथे खूप काही गोष्टी पाडलेल्या आहेत. शिवाय ड्रॉईंगगरूमच्या शोकेस भरलेल्या आहेत. तुला जे उपयुक्त वाटतय, ते घेऊन जा. ‘

‘असं का आई? ’

‘आता मला या सगळ्याचा काय उपयोग? इकडे ये. ‘ नीला प्रियमला आपल्या खोलीत घेऊन गेली.

‘या कपाटात जरीच्या आणि कांजीवरमच्या साड्या आहेत मी काही आता त्या नेसणार नाही. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या लग्नात नेसू शकतेस’

प्रियमने सगळा गठ्ठा उचला. ‘माय गॉड! सो ब्युटीफूल. मी यातून ड्रेस बनवले, तर तुम्हाला चालेल ना! ’

‘हो! पण एक अट आहे. मला फोटो पाठवावे लागतील. ’

“आई लव यु, लव यु! ’’

निशांतने काही पुस्तके आणि दोन-चार छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आणि निरूपयोगी वस्तूंचा ढीग लावला. दोन –चार दिवस खुशीने एकत्र राहून त्यांनी निरोप घेतला.

हळू हळू घर रिकामं होऊ लागलं. अभिजीतला निरोप दिल्यानंतर त्याचे कपडे, इतर छोट्या-मोठ्या वस्तू तेव्हाच तिने अनाथाश्रमात देऊन टाकल्या होत्या. तरीसुद्धा टेबलाच्या एका ड्रॉवरमध्ये शूज आणि चपलांचा खजिना सापडला.

घर आता मोकळेपणा अनुभवत होतं. थेंक्स विशाखा सुब्रह्मण्यम, माझ्या जीवनातील नव्या अध्यायासाठी थॅंक्स अगेन. अंजूला बोलावलं. घराची चांगली साफ-सफाई करवून घेतली॰ तिलाही उरल्या सूरल्या गोष्टी देऊन टाकल्या.

अनेक गोष्टी गोळा करून घेतल्या. जीवनातील ब्याऐंशी वर्षाचा काळ तिने चांगला गुंडाळून घडी करून ठेवला.

आता शेवटचा एकच तंतू तोडायचा राहिला होता.

रीचाचे दागिने इथेच होते. ती काहीच न घेता गेली होती. तिने एकप्रेमाचं, मायेने ओथंबलेलं पत्र रीचाला लिहिलं आणि दागिन्यांच्या बटव्यात ठेवलं. मी गेल्यावर कदाचित ती इथे येईल आणि हे पत्र तिला पोचेल, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. अजूनही काही मूल्यवान दागिने तिच्याकडे होते. प्रत्येक दिवाळीत सोन्या-चांदीची काही ना काही वस्तू अभिजीत त्यांना द्यायचा. ती तर गेली कित्येक वर्षे एक सोन्याची साधी चेन, कुड्या आणि बांगड्या याशिवाय दुसरं काही घालायची नाही. हे दागिने विकून महिलाश्रमासाठी कॉम्प्युटर खरेदी करावा, असं तिच्या मनात आलं.

तिजोरी रिकामी झाली. शेवटी एक छोटीशी बारकी थैली उरली. थैली कुठली? पोटलीच. आपल्या मांडीवर ती घेऊन, ती किती तरी वेळ बसून राहिली. अभिजीतने आणि तिने एक-दुसर्‍याला लिहिलेली पत्रे, सिनेमाची तिकिटे, विवाहापूर्वी एक रात्र ज्या रेझॉर्टमध्ये ते राहिले होते आणि मधुरजनी साजरी केली होती, त्या रेझॉर्टचं बील, सगळं त्या रेशमी बाटव्यात होतं. स्मृतिकोशात संचित केलेलं होतं. काय नव्हतं त्यात? सगळच होतं. जीवन, रूसवे-फुगवे, समजावणी, हसू आणि थोडेसे आसूसुद्धा. वस्तूंचं ‘डेथ क्लीनिंग’ केलं जाऊ शकतं, पण त्या आठवणींचं काय? त्या तर आगदी व्यक्तिगत. तृष्णेसारख्याच. कुणाला देता येणार नाहीत. काळजाच्या कुपीत सजवून ठेवलेल्या. हृदय दिसतं. काळजाचं काय? कुणी पाहिलय? तरीही त्याच्या प्रतिफळाची प्रतीती येतेच..

घराकडे नजर वळली आणि सुटकेचा अनुभव आला. मुक्तीचा खोलवर श्वास घेतला. असंख्य वस्तूंच्या जीवनाचं दडपण आलं. विशाखा सुब्रह्मण्यम लिहिते, ‘रिमूव्ह ध एक्सेस बॅगेज फ्रोम योर लाइफ एंड फिल फ्री. ’ जणू एखाद्या कारावासातून ती मुक्त झाली. मायेचे आवरणं बाजूला सरले, त्यामुळे परमानंदाचा चेहरा प्रगट झाला.

तिने बॅग पॅक केली. काळजीपूर्वक रेशमी पोटली त्यात ठेवली. मालतीताईंना चावी दिली. ‘माझ्या मुलाचं लग्न आहे. मी दोन महीने काही येणार नाही. आपल्याला गरज लागेल, त्याप्रमाणे माझ्या घराचा जरूर उपयोग करा. ’

त्या नीलाच्या गळ्यात पडल्या. भावनावेगाने रडू लागल्या.

ती ट्रेनमधे बसली, तेव्हा तिच्या मनात विचार आला, एका नवीन प्रवासाची सुरुवात. वयाच्या कुठल्याही थांब्यावरून सुरुवात करता येऊ शकते.

ऋषिकेशच्या गेस्टहाऊसमधील छोट्याशा कॉटेजमध्ये तिने आपली बॅग ठेवली. मन प्रसन्न होतं. चारी बाजूला मखमली गवत. तिथून थोड्या अंतरावर वन्यप्रदेश सुरू होत होता. गंगातट फारसा लांब नव्हता. बेडरूममध्ये मोठ्या फ्रेंच विंडोज़ होत्या. खाली लगेचच बगीचा होता. जसा काही बगीचा तिच्या खोलीतच होता आणि सुगंधित फुले तिला गंधलेपन करत होती.

थोड्या अंतरावर दुसर्‍या कॉटेजमध्ये एक कुटुंब आपल्या मुला-बाळांसह आलं होतं. भोजनाच्या वेळी रोज भेटणं होत असे. बोलणंही होत असे. खूप गप्पा झाल्या. बरोबर फिरले. म्युझियम पाह्यलं. वेगवेगळ्या मंदिरांचं आर्कीटेक्चर बघताना मजा वाटली आनंद झाला.

नंतर एका संध्याकाळी ती लक्ष्मणझूल्यावर गेली. गंगेची आरती एवढ्यातच संपली होती. तिच्या महाआरतीची स्पंदने वार्‍यावर वहात होती आणि खाली जान्हवी वहात होती. हळू हळू अंधार पडत चालला होता. गंगेच्या धारेत असंख्य दिवे झगझगमगत होते. हे दिवे जल प्रवाहात तरंगत – झुलत दूरवर जाऊन जलसमाधी घेत होते. त्याच्यामागे आणखी एक दिवा. मग त्यामागे आणखी. ही शृंखला खंडित होत नाही. हासुद्धा जसा काही या प्रवाहमान धारेचा एक जलबिन्दु.

ती खाली उतरून गंगेच्या पायर्‍यांवर आली. तिथे आता आरतीची गर्दी नव्हती. मंदिरातील घंटारवाने हवा तरंगित होत होती. इतक्यात एक मुलगा पळत पळत तिच्याजवळ आला.

“मैया, बस एकच दिवा राहिलाय. घ्या ना! वीस रुपयात देतो. प्लीज… ’’त्याने फुलांनी भरलेया द्रोण समोर ठेवून तिचा पदर धरला. ‘घ्या. मैया, पंध्रा रुपयालाच देतो. ’

नीलाने द्रोण घेतला. फुलांच्या खाली रेशमी पोटली ठेवली. दिवा लावला. खाली जलप्रवाहात तरंगण्यासाठी ठेवून दिला.

‘मैया, असं नाही करायचं. गंगाजल माथ्यावर ठेवा. ’

ती हसली.

‘तू खूप शहाणा आहेस. मोठं झाल्यावर पंडित होणार का? ’

‘हो. इथेच पाट लावून बसेन. बाबाच्या पाठशाळेत जातो ना! ’

नीलाने शंभर रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवली. त्याचं तोंड उघडच राहिलं. ओरडत तो नीलाला चिकटला. तिने प्रेमाने त्याला हलकीशी चापट मारली.

‘चल. सोड. आपण जेवायला कुठे तरी जाऊ या. बोल. कुठे जाऊया? ’

दोघे हसले. नीलाचा दिवा थोडे अंतर जाऊन समाधिस्थ झाला. नीलाने नमस्कार केला. आई, तुझ्या चरणी सर्वस्व अर्पण.

‘चल मैय्या, सांभाळून हा! ’ मुलाने तिचा हात धरला आणि तो घाटाच्या पायर्‍या चढू लागला.

— समाप्त —

☆☆☆☆

मूळ लेखिका – वर्षा अडालजा – मोबाइल: 9833076673

हिन्दी अनुवाद – डॉ.रजनीकान्त एस.शाह – मोबाइल: 9924567512

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ डेथ क्लीनिंग… (अनु.) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : वर्षा अडालजा – हिन्दी अनुवाद : डॉ.रजनीकान्त एस.शाह ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

☆☆☆☆

भल्या पहाटे, नेहमीप्रमाणेच नीलाचे डोळे उघडले. काही वेळ ती तशीच झोपून राहिली. तिचे योगगुरू म्हणायचे, जेव्हा बिछान्यातून उठाल, तेव्हा उजवीकडे वळून आरामात उठा. अचानक झटकन उठलं, तर हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता असते.

ती हळुवारपणे उठली, तेव्हा उजव्या पायाच्या गुढग्यात थोडं दुखत असल्याचं जाणवलं. गेले काही महीने असंच चाललं होतं. अजून निशांतला सांगितलं नव्हतं, नाही तर लगेच म्हणाला असता, ‘ चल आई, ओर्थोपेडिक डॉक्टरला दाखवून येऊ.’ पण जास्त त्रास होत नव्हता, त्यामुळे त्याची तिला फारशी गरज वाटली नाही. चहा टाकला. बाल्कनीत ठेवलेल्या कुंडीतील पुदिन्याच्या झाडाची ताजी पाने, थोडंसं आलं आणि मसालेदार चहाने भरलेला मग घेऊन ती त्या छोट्याशा बाल्कनीत बसली.

अनेक वर्षे हा क्रम चालू होता. अभिजीत जीवंत होता तेव्हा आणि तो नसतानाही. सूर्य आपल्या किरणांची टोपली घेऊन इथूनच त्यांच्या घरात आणि जीवनात प्रवेश करायचा. काही काळ घर चमकून उठायचं. नंतर तो उंच उंच वृक्ष ओलांडून निघून जायचा. तिथे वर्तमानपत्रे यायची. सकाळी वर्तमानपत्रे वाचत, त्यातील वेगवेगळ्या बातम्यांवर चर्चा करायची दोघांनाही सवय होती.

आज एकटी असतानाही तिची ही सवय तशीच आहे. तेव्हा अभिजीतचं ऑफिस, निशांत आणि रीचाची शाळा, नाश्ता, घरातली छोटी-मोठी कामे, दुपारी महिलाश्रमात जाणं… जीवन दोन काठांमधून वाहाणार्‍या नदीसारखं वेगाने धावत होतं. अनेक आवाज घरातून यायचे. नंतर एकामागून एक सगळे निरोप घेऊन निघून गेले. निशांत बंगलोरच्या एका कंपनीत काम करत होता. त्याने आपल्याबरोबर काम करणार्‍या प्रियम बरोबर लिव-इनमध्ये राहून नंतर कोर्ट मॅरेज केलं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. नियमित फोन करत होते. चार-सहा महिन्यांनी भेटायलाही येत होते. प्रियमने त्यांना आयफोन भेटीदाखल दिला होता. ‘मम्मा यू हेव टु वोट्सएप मी, ओ.के’.

तसं सगळं ओ.के.चं होतं. तरीही मनात एक चिंता होती. रीचाने आपल्या मर्जीने, आपल्याला आवडणार्‍या तरुणाशी विवाह केला होता. याबद्दलही काही विरोध, हरकत नव्हती. पण कलंकित चारित्र्य असलेल्या राजकारणी पुढार्‍याचा परिवार. परिवारातलं कुणी ना कुणी जेलयात्रा करून आलेलं होतं. त्याच्या मुलाबरोबर विजयबरोबर इथले सगळे संबंध तोडून ती कॅनडाला निघून गेली होती. तिने तिची मनधरणी केली होती, पण क्वचित कधी हाय-हॅलोच्या पुढे बोलणं जात नव्हतं.

डोअर बेल वाजली. ती हळूच उठली. आज रविवार. पाच-सहा वर्तमानपत्रांचा गठ्ठा आला. तिने पुन्हा चहा करायला ठेवला आणि सोफ्यावर पाय पसरून बसली. जगभरातील बातम्या आरामात वाचत राहिली. वय झालं. आता आम्हाला काय करायचय, असं म्हणणं तिला मुळीच आवडत नव्हतं. तरुणपणात जेव्हा ती अतिशय व्यस्त असायची, तेव्हाही तिचे पती म्हणायचे, आम्ही आमच्या जीवनात भलेही व्यस्त असलो, तरी जगाशी जोडलेलं असलं पाहिजे. त्यामुळे आपली क्षितिजे रुंदावतात.

दुपारी थोड्या वेळासाठी ती महिलाश्रमात जायची. तिथे अनेक प्रकारचे आभ्यासवर्ग चालायचे. एक वर्ग तिचाही असायचा. देशाच्या वेगवेगळ्या भागात घडणार्‍या घटनांविषयी ती रसाळ भाषेत माहिती द्यायची. कधी कधी त्यांना इंग्रजीही शिकवायची. अनेकांच्या जीवनाचा ती हिस्सा बनली होती. घराच्या समोर म्युन्सीपल गार्डन होती. तिथे काही वेळ योग करणार्‍या गटाशी ती जोडली गेली होती. परतू तास संपला, की ती लगेचच घरी यायची. निवृत्त झालेली पुरुष मंडळी तिथे गप्पा-गोष्टी करत रहात. संध्याकाळी ती फिरायला जायची, तेव्हा अनेक शेजारणी गप्पा मारताना दिसायाच्या, पण ती त्यांची नजर चुकवून तिथून निघून जायची. आज रविवार. आज योगाच्या क्लासला सुट्टी. आज वेळच वेळ होता. तिने दोन पेपर पलंगावर ठेवले. दुपारी वाचण्यासाठी. निशांत आणि प्रियमशी बोलणं झालं. मग आंघोळ करून तयार होऊन बाजारातून सांभाराचं साहित्य आणलं. मोबाईलवर गुलजारांची गाणी ऐकता ऐकता तिने इडली सांभार बनवलं. अंजू कामाला आली, तेव्हा तिलाही खायला दिलं. नवीन आलेल्या सिनेमाबद्दल ती बोलत राहिली, तेव्हा तिला तिकिटाचे पैसे दिले आणि म्हणाली, ;जा बाई, तू पण जा. मजा कर. तिला खूप आनंद झाला. फटाफट काम आवरून ती निघून गेली.

मग घर पुन्हा एखाद्या ध्यानस्थ मुनीप्रमाणे शांत आणि निश्चल झालं. वर्तमानपत्रांच्या कागदांच्या फडफडण्याचा आवाज तेवढा त्या शांततेचा अधून मधून भंग करत होता. इजिप्तमध्ये नवी ममी सापडली… करोडोंचा भ्रष्टाचार…इराणमध्ये स्त्रियांचे आंदोलन… तिने काही बातम्या रेखांकीत केल्या. इंग्रजी कथांच्या अनुवादाच्या पुस्तकाचा रिव्ह्यू वाचून ते पुस्तक अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलं. थोडी डुलकी आली, म्हणून वर्तमानपत्र बाजूला ठेवता ठेवता, एका लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष गेलं… डेथ क्लीनिंग.

डेथ क्लीनिंग? म्हणजे? … एक नवीनच शब्द.

तिने लेख वाचायला सुरुवात केली. अप्रतिम लेख आणि अगदी नवा विचार. ब्याऐंशी वर्षाची एक महिला विशाखा सुब्रमण्यम यांची मुलाखत घेऊन वर्तमानपत्राच्या एका वार्ताहराने लेख तयार केला होता. 

नीला उत्साहाने लेख वाचू लागली.

सुरुवातीलाच लिहिलं होतं – हा लेख सिनियर सिटीजन्ससाठी खास आहे, पण शीर्षक वाचून, लेखातील विचार निराशावादी वा पलायनवादी आहेत, असे समजू नका. डिप्रेशनशी यातील विचारांचा काहीही संबंध नाही, उलट डेथ क्लीनिंग इज सेलिब्रेशन ऑफ लाइफ। मृत्यू जीवनाचा उत्सव आहे.

नीला बसली आणि तिने एकाग्रतेने तो लेख वाचला.

2017 मधे स्वीडिश महिला मार्गारेटने `जेंटल आर्ट ऑफ स्वीडिश डेथ क्लीनिंग’ विचाराचे प्रवर्तन केले. आपल्या जीवनाच्या सूर्यास्ताच्या काळात हे विचार तिने अमलात आणले. जीवन हा लोहचुम्बक आहे. तो अनेक वस्तुंना आपल्याकडे खेचत रहातो. जीवनाच्या दरम्यान अनेक छोट्या-मोठ्या वस्तुंनी आपलं घर भरून जातं. आपल्यानंतर त्या सगळ्या वस्तूंचं काय? गुजरीबाजारातून आणलेले आपले मनपसंत जुने घड्याळ, आजीच्या काळातील जुनी तिवई, मुले छोटी होती, तेव्हा त्यांच्यासाठी खरीदलेली आणि मोठ्या काळजीपूर्वक जपून ठेवलेली खेळणी, फोटोंचे आल्बम, भांडी-कुंडी, कपडे… आपल्याला निरोप दिल्यानंतर, या सगळ्याची विल्हेवाट लावताना आपल्या स्वजनांना नाकी नऊ येतील. कदाचित ते आपल्यावर रुष्ठही होतील. त्या ऐवजी आपण आपल्याच अनावश्यक वस्तू, ज्यांना जी गोष्ट पसंत आहे, त्यांना, किंवा ज्यांना उपयोगी पडतील त्यांना देत रहा. याला डिकल्टरिंग म्हणतात. ’डिकल्टरिंग युवर हाउस एँड लाइफ टु.’ आपल्याला गृहस्थाश्रमानंतर सन्यस्ताश्रमात प्रवेश करायचा आहे. नाही… नाही… वनात प्रवेश करायचा नाहीये. साधं जीवन जगणं हा उद्देश आहे. त्यामुळे आपोआप मोह सुटत जातील. वस्तू कमी असतील. त्यामुळे पॉज़िटिव एनर्जीच्या लहरींनी आपलं जीवन पुलकित होईल.

लेख मोठा होता. नीलाने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. हे सगळं वाचण्याची गरज नाही. डेथ क्लीनिंग या शब्दानेच मनाचा कब्ज़ा घेतला. तिने घरात सगळीकडे नजर फिरवली. घरात अनेक चीजवस्तू भारंभार होत्या. इथे जे लोक राहिले होते, त्यांनी आपल्या पदचिन्हांबरोबर आणखीही अनेक गोष्टी ठेवून दिल्या होत्या. ड्रॉइंगरूमच्या सीलिंगवर लावलेले झुंबर. रीचा जेव्हा कॉलेजमध्ये होती, तेव्हा कुणा मैत्रिणीच्या घरी असं झुंबर पाहिलं होतं आणि हट्टाने अभिजीतला ते विकत आणायला लावलं होतं. घरात अनेक वेळा अभिजीतचे मित्र येत. ऊंधियापार्टी आणि पाकातल्या पुर्‍या यांनी आदरातिथ्य होई. रीचा-निशांतच्या वाढदिवसाची पार्टी होई. तेव्हा ते झुंबर घर प्रकाशमान करत राही. घर उजळून जाई. 

ती विचार करत राही. किती तरी वर्षांपासून स्वीचच चालू केलेला नाही. कोणासाठी चालू करायचा? कोणत्या निमित्ताने? निशांत आणि प्रियमला एकदा म्हंटलं होतं, झुंबर खूप महाग आहे. घेऊन जा. पण, ती म्हणाली, ‘आई, आम्हाला ‘कंसिल्ड लाइटिंग’ पसंत आहे.

तिने खाली उभं राहून त्या झुबराकडे बघितलं. त्याला खूप लोलक जडवले होते आणि त्या सगळ्यांवर धूळ माखली होती. ज्याचा उपयोग अनेक दिवसात केलेला नव्हता आणि पुढही केला जाण्याची शक्यता नव्हती, अशा गोष्टीचा उपयोग कुणी करणार असेल, तर त्याला का देऊ नये? अरे, यापूर्वी असा विचार का मनात आला नाही? हे म्हणजे काही मनपसंत वस्तू विकणं नव्हे. हळू हळू हे विचार मनात रुंजी घालू लागले.

नीला सकाळी उठून योगाच्या क्लासला गेली. गुरूजींनी ध्यानधारणेबरोबरच व्यायामदेखील करवून घेतला. क्लास संपल्यावर तिने गुरूजींना विचारले, ‘आपण रामकृष्ण आश्रम, चिदानंद गुरुकुल, हरद्वारचा आश्रम इथेही वर्ग घ्यायला जाता. तिथे सणावारी, संमेलने वगैरे होतात. माझ्याकडे एक चांगले झुंबर आहे. तिथे झुंबराचा उपयोग होणार असेल, तर तिथे ते मी पाठवण्याची व्यवस्था करेन. त्यासाठी होणारा खर्चदेखील मी करेन.’ गुरूजींनी मोठ्या खुशीने लगेचच संमती दिली.

‘हरिद्वारला गंगाघाटावर एक मोठं भवन आहे. तिथे अनेक उत्सव होतात. ताई, आपण व्यवस्था करत असाल, तर उत्तम होईल.’

तिने त्याच दिवशी पॅकर्स अ‍ॅंड मूव्हर्स कंपनीला फोन लावला. झुंबर काढले. ते स्वच्छ केले आणि ‘फ्रेजाईल’ च्या स्टिकरसह एक मोठा कंटेनर हरिद्वारच्या आश्रमात पोचला.

घरात खूप फर्निचर होतं. आता त्याची जरूर नव्हती. जास्तीच्या खुर्च्या, सोफा, तिवया, ट्रकमधून प्रवास करून महिलाश्रमात पोचले. जास्तीच्या गाद्या, उशा आणि चादरी अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये गेल्या.

आता स्वैपाकघरात प्रथमच पहात आहोत, अशी ती चमकली. अरे, इतक्या सार्‍या बरण्या, डबेडुबे, भांड्यांचा ढीग जमला होता आणि तिला त्याचा पत्ताच नव्हता. स्टुलावर चढून वरचे कापाट उघडले. अरे एकदम नवीन अनब्रेकेबल इंपोर्टेड डिनरसेट! तिला आठवलं, ती आणि अभिजीत बँकॉकला मित्रांबरोबर गेले होते, तेव्हा त्याला हा डिनरसेट खूप आवडला होता. आणि पाच किलो अतिरिक्त सामानाचे पैसे काउंटरवर जमा करून त्यांनी तो आणला होता. आपल्या हातांनी तो कुरवाळत, तेव्हा ती म्हणाली होती, आता यानंतर आपली ऊंधियापार्टी याच डिनरसेटमध्ये। पण तशी वेळ आलीच नाही..

बँकॉकहून परतल्यावर काही काहीने गेले असतील. एका रात्री फिल्म बघून परतल्यावर दोघे जण गप्पा मारत झोपी गेले, तर सकाळी अभिजीतने डोळेच उघडले नाहीत. झोपेतूनच अंतहीन प्रवासासाठी ते निघून गेले.

आठवणींनी तिला असं घेरून टाकलं होतं, की तिला गुदमारल्यासारखं होऊ लागलं होतं. इथल्या घरात जशी ती कैद झालीय, असं तिला वाटू लागलं. ती लगेचच बागेत फिरायला बाहेर पडली. हळू हळू अंधुक दिसू लागलं होतं. दिवे झगमगू लागले होते. काही पुरुष मंडळी खाण्या-पिण्याची मजा घेत होते. आया आपल्या मुलांना घेऊन निघून गेल्या होत्या. झोपाळे आता रिकामेच झुलत होते. त्यांचं किलबिलणं अजूनही हवेत गुंजत होतं. ती निघाली.

– क्रमश: भाग १ 

☆☆☆☆

मूळ लेखिका – वर्षा अडालजा – मोबाइल: 9833076673

हिन्दी अनुवाद – डॉ.रजनीकान्त एस.शाह – मोबाइल: 9924567512

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रकाशाच्या सावल्या…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘प्रकाशाच्या सावल्या…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆

पालखी खांद्यावर घेतली नि माझा रोम-रोम शहारला!, भक्तिभावानं अवघी काया पुलकित झाली, डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले.

त्या गुरुवारी प्रथेप्रमाणं सायंकाळी साग्रसंगीत पूजा आरती झाली नि पूर्व दरवाजापासून प्रदक्षिणा सुरू झाली. पश्चिम दरवाजाला पालखीला आधार देऊन उभं केलं. दत्तमहाराजांची पदं आणि स्तोत्रं सुरू झाली. ईश्वरीय जाणिवेनं माझ्या सर्वांगातून विजेचं चैतन्य वहात होतं. ह्यालाच साक्षात्कार म्हणत असावेत असं मनोमन वाटून गेलं. समोर उभा असलेला अफाट

 जनसमुदाय मला दिसत नव्हता. फक्त दत्तमहाराजांची मूर्ती डोळ्यांना दिसत होती. अननुभूत अशा प्रसन्न जाणिवेनं मी पूर्णपणे विलीन झालो होतो. तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि अत्यानंदात मी हरखून गेलो.

याचसाठी केला होता अट्टाहास… !

खरोखर! दत्तमहाराजांच्या पालखीची सेवा मिळणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. अनेकजण त्यासाठी आस लावून बसले होते. ते भाग्य माझ्या पदरात पडलं होतं. एवढ्या दिवसांची तपश्चर्या होती. व्रतस्थ आणि नेमस्त जीवनाची ती फलश्रुतीच होती. शिवाय माझ्या वडिलांची आणि आजोबांची पूर्वपुण्याई.

मी श्रीपाद अवधूत पंत! आप्पा म्हणजे माझे वडील अवधूत महामुनिश्वर पंत! महामुनिश्वर गोरक्षनाथ पंत म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांच्या जन्मानंतर लगेचच माझी आजी वारली. तेव्हापासून आजोबांनी स्वतःला दत्तमहाराजांच्या सेवेत झोकून दिलं. वडिलांना वेदांचं, उपनिषदांचं ज्ञान दिलं. कठोर अनुशासनात ते त्यांच्याकडून ध्यानधारणा, जपतप सारंकाही करून घेत. आजोबांसारखेच वडीलही अधिकारी पुरुष बनले. आजोबांची दत्तात्रेयांवर नितांत श्रद्धा होती. वडीलही आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून दत्तभक्त झाले. आजोबांची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. योगायोग असा की आजीसारखीच माझी आईपण माझ्या जन्मानंतर लगेच निवर्तली. म्हणून लग्न करायचंच नाही, अविवाहित राहून भक्तिमार्गात राहायचं असं मी ठरवून टाकलं होतं. वडिलांनाही माझं अध्ययन आणि दत्तमहाराजांची सेवा याशिवाय दुसरं विश्वच उरलं नाही. म्हणूनच माझ्या खांद्यावर पालखी पाहून त्यांना कृतकृत्य वाटलं. रात्री झोपतांना आप्पांनी अपार कौतुकानं माझ्याकडं पाहिलं. पालखीची सेवा मला मिळाली म्हणून त्यांच्या उरीपोटी माझ्याबद्दल प्रेम दाटून आलं. ज्या असोशीनं त्यांनी मला ज्ञान दिलं, त्याचं सार्थक झालं. त्यांच्या जन्माची तीच जणू इतिकर्तव्यता होती.

त्यांचा प्रेमळ हात माझ्या मस्तकावर ठेवून आप्पा म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी सोनं केलं बघ आपल्या जन्माचं! आता हे पालखीचं कार्य तू पुढं नेशील, मी डोळे मिटायला मोकळा. ’’

माझे डोळे मात्र भरून आले. त्यांच्या हातातून, स्पर्शातून त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. आशीर्वादाबरोबर साता जन्माचं संचितच जणू त्यांनी मला दिलं.

त्या रात्री अतीव समाधानानं मी झोपी गेलो. सारी रात्र खांद्यावर पालखीची जाणीव मला होत होती. पहाटे रोजच्यासारखी जाग आली. स्नान, संध्या, पूजा, उपासना झाली. प्रत्येक क्षणी खांद्यावर पालखीत दत्तमहाराज असल्याची जाणीव होती. त्याचवेळी पुढच्या गुरुवारच्या पालखीची मी वाट पहात होतो. गुरुवार आला. पुन्हा खांद्यावर पालखी घेऊन प्रदक्षिणा झाल्या. तीच धन्यता, तेच समाधान! अपूर्व! तरीही अपुरं! पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हा! प्रत्येक गुरुवारी. नित्याचंच. समाधानही तेच होतं मन व्यापून टाकणारं नि काळजात भरून रहाणारं. दर गुरुवारी खांद्यावर पालखीत आणि एरवी पालखीशिवाय दत्तमहाराज सतत माझ्यासवेच असायचे आणि त्यांच्याबरोबर मी दिव्य आनंदात! हा दिव्य आनंदाचा कुंभ माझ्या काळजात ओतप्रोत भरलेला होता. त्याला कधीही ओहोटी लाहणार नाही याची मला खात्री होती. कारण माझी श्रद्धा आणि वाडवडिलांचे आशीर्वाद यांची मोठी पुंजी माझ्याजवळ होती. माझं रोजचं जगणं, रोजची दिनचर्या, दत्त, दत्त आणि दत्तमय होऊन गेली होती.

दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मी मंदिरात असे. अनेक भक्तांची पादुकांना अभिषेक करण्यासाठी रांग लागलेली असे. ते सर्व अभिषेक करण्याची नित्यसेवा माझी होती. गाभार्‍यात कुणालाच प्रवेश नव्हता. गाभार्‍याचा एक दरवाजा म्हणजे एक छोटीशी कमान होती. त्या कमानीतून लोक फक्त अभिषेकाचे ताट आत सरकवत आणि गोत्र सांगत. त्यांचे पूर्ण दर्शनही आम्हाला आतून होत नसे. त्या दिवशी खूप अभिषेक झाले. दहा वाजता दोन सुंदर हातांनी एक तबक आत सरकवले. मला वाटतं तोच क्षण होता. बहुधा! ज्या क्षणी माझ्या काळजातला आनंदाचा कुंभ डळमळायला सुरुवात झाली असावी. पण मला मात्र त्याची यत्किंचितही जाणीव नव्हती.

ते गोरेपान सुंदर हात मी पहातच राहिलो. लांबसडक, निमुळती बोटं आणि नक्षीदार बिलवर! त्यातच माझी नजर अडकून पडली.

आप्पा पण तिथेच होते गाभार्‍यात. ते म्हणाले, ‘‘दहा वाजले. आता वेळ संपली अभिषेकाची. उशीर झाला आहे. ’’

‘‘हो उशीर झालाय, पण मी खूप वेळची रांगेत उभी आहे. कृपया नाही म्हणू नका, माझा नवसाचा अभिषेक आहे. ’’

‘‘मागे किती लोक आहेत रांगेत? ’’ आप्पांनी विचारलं. ‘‘नाही, आता कुणीच नाही. ’’

आप्पा म्हणाजे, ‘‘ठीक आहे, पण नेहमी दहाच्या आत येत जा. ’’

‘‘हो गुरुजी. ’’

‘‘गोत्र सांगा. ’’

‘‘गार्ग्य’’.

 एवढा मंजुळ आवाज मी कधीच ऐकला नव्हता आणि एवढे सुंदर हातही मी कधीच पाहिले नव्हते. आप्पांनाही बहुदा त्या मंजुळ आवाजातलं आर्जव ऐकून नाही म्हणायला जमलं नसावं.

 ‘‘श्री अभिषेक करून घे. ’’

मी आप्पांनी दिलेली आज्ञा शिरसावंद्य मानली.

शेवटचा अभिषेक केला. प्रसाद दिला नि रोजच्या दिनक्रमात मी बुडून गेलो. दुसर्‍या दिवशी त्या सुंदर हातांनी अभिषेकाचं ताट सरकवलं. गोत्र सांगितलं. तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी तर सकाळी आठ वाजता पहिलंच तबक त्या हातांनी सरकवलं. मीच विचारलं ‘‘गार्ग्य का? ’’ आप्पांनी चमकून माझ्याकडं पाहिलं.

‘‘रोज अभिषेक करता का? ’’

‘‘हो अकरा दिवसांचा नवस आहे. ’’

नकळत मी त्या सुंदर हातांची वाट पहात राहिलो. काही कारण नसतांना. खरचंच त्यानंतर सात दिवस ते हात मला दिसत राहिले आणि मी आनंदीत होत राहिलो. इथंच धोक्याची सूचना माझ्या लक्षात यायला हवी होती. ती आली नाही, कारण पुढं खूप काही वेगळंच घडायचं होतं माझ्या आयुष्यात.

माझी नित्यसेवा, उपासना चालूच होती मनोभावे. एक दिवस पंचांग घेऊन सभामंडपात बसलो होतो. रोज तासभर बसत असे, तो शिरस्ताच होता. कुणा-कुणाचे प्रश्न असत. त्यांना पंचांगात पाहून उत्तर देत असे.

अचानक त्या सुंदर हातांनी एक कागद माझ्या पुढे ठेवला. त्या ओळखीच्या हातांकडे मी पहात राहिलो. तेवढ्यात तो ओळखीचा मंजुळ आवाज कानावर पडला, ‘‘पत्रिका पहायची होती’’. हातांसारखाच तो आवाजही सुखावणारा होता.

‘‘काय प्रश्न आहे? ’’

‘‘लग्न कधी होईल? ’’

मी पत्रिका नीट पाहिली आणि सांगितलं, ‘‘तुळशीच्या लग्नानंतर पहिल्या मुहूर्ताला. ’’

‘‘खरंच? ’’ तिनं आनंदून विचारलं. मी वर पहात म्हटलं ‘‘खरंच’’.

त्या सुंदर हातांइतकीच ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवती.

माझ्या उत्तरानं ती आनंदून गेली. तिच्या सुंदर हातांनी मला नमस्कार केला. मी समोरच पहात राहिलो. ती निघून गेली तरी तिचा सुंदर चेहरा मला दिसत राहिला.

उठून उभा राहिलो. तेव्हा समोरच्या आरशात माझं लक्ष गेलं. मला आश्चर्यच वाटलं. यापूर्वी असं कधीच माझ्या प्रतिमेकडे लक्ष गेलं नव्हतं. आरसा तर पूर्वीपासून होता. माझ्या आयुष्यात काही नवीन प्रतिमा उभरण्याची तर चिन्ह नसावीत?

छे! काहीतरीच! मी मान झटकली. पुन्हा स्वतःच्या आरश्यात न्याहाळू लागलो. ‘‘तसा मीही चांगला आहे दिसायला. शेंडी काढून भांग पाडला तर अजूनच देखणा दिसेन. ’’

हे काय चाललं होतं माझ्या डोक्यात? आजपर्यंत कधी असे विचार माझ्या ध्यानीमनी नव्हते. मी असं कधी स्वतःला मोठ्या आरशात पाहिलं नव्हतं. हंऽ काहीतरीच. म्हणून मी पुन्हा मान झटकली.

‘‘मी तुमची दक्षिणा दिलीच नाही. ’’ ती पुन्हा आली होती. मी चमकून पहात राहिलो. खरं तर मी भान हरखून पहात होतो. तिनं भानावर आणलं.

‘‘नाही का, लग्न कधी होईल म्हणून प्रश्न विचारला. ’’

‘‘कुणाचं लग्न. ’’

‘‘इश्य! ’’ म्हणून ती लाजली.

भानावर आलेला मी परत भान हरपून पहात राहिलो.

‘‘सांगा ना!… दक्षिणा? ’’

दचकून मी म्हटलं, ‘‘छे छे काहीतरीच! दक्षिणा कसली? ’’

ती हसली आणि निघून गेली. तिचं हसणं म्हणजे गुलाबपाण्याचं शिंपणच. त्यानं सुखावून माझं लक्ष पुन्हा आरशातल्या माझ्या छबीकडे गेलं. क्षणभर माझ्या शेजारी ती मला दिसली. वाटलं छान दिसतोय जोडा. या विचारासरशी माझं मन आकाशात तरंगू लागलं.

‘‘श्रीपाद अरे चल, कीर्तनाची वेळ झाली. ’’ माझं विमान धाडदिशी जमिनीवर आदळलं. माझ्या अधीर मनाला मी गप्प केलं. लग्न, स्त्री याचा कधी विचार केला नव्हता. मला करायचाही नव्हता. ‘‘श्रीपादऽ’’ पुन्हा आप्पांची हाक आली. ‘‘आलो… आलो. आप्पा’’ म्हणून मी धावत कीर्तनगृहात गेलो. आप्पा पेटीचा भाता उघडून तयार होते. मी येताच त्यांनी सूर धरला. मीही ठोकून ठोकून तबला लावू लागलो. खरं तर माझे विचार… सैरभैर धावणारे… ठोकून लावण्याची गरज होती. ते जमेना म्हणून तबलाही सुरात लागेना. माझ्या मनात त्या सौंदर्यवतीचा लागलेला सूर मात्र सुटेना!

शेवटी मी तबल्यावर थाप दिली. भास्करबुवांचं कीर्तन सुरू झालं. सुरू झालं अन् संपलं. संपल्यावरही मी वाजवतच होतो. आप्पा ओरडले, तेव्हा दचकून थांबलो. सार्‍या कीर्तनभर मी काय वाजवत होतो कुणास ठावूक! माझ्या डोळ्यासमोर आमची दोघांची… माझी आणि त्या लावण्यवतीची आरशात प्रतिमा दिसत होती. रात्री झोपतांना आप्पा म्हणाले, ‘‘श्री, अरे आज भजनी ठेक्याच्या ऐवजी त्रिताल वाजवत होतास, बुवा भजन म्हणत असतांना बुवा तुझ्याकडे बघत होते. तुझं अजिबात लक्ष नव्हतं. काय चाललंय तुझ्या डोक्यात? ’’

‘‘हं… ! दमला असशील. झोप आता. ’’ मी कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. पण डोळ्यापुढं तीच दिसत होती. ती, तिचं हसणं, तिचं ते गुलाबपाण्याचं शिंपण, तिचे सुकोमल हात… तिचा मृदुमधूर कानात रुंजी घालणारा आवाज!! छे छे छे काय पहात होतो मी? कशासाठी? माझा काय संबंध तिच्याशी? ती… ती कोण – ती? मला तर तिचं नावही माहीत नव्हतं. पत्रिका पाहिली पण तिचं नावही नाही विचारलं. हे सारं थांबवलंच पाहिजे. असा निश्चय करून मी झोपेची आराधना करू लागलो.

त्यानंतर दोन-चार दिवस ती कुठेच दिसली नाही. वाटलं बरं झालं. विषयच संपला. पण दुसरे दिवशीच पहाटे-पहाटे ती दिसली. मी मंदिराच्या पायर्‍या चढतांना अचानक तिच्या हातातली फुलांची परडी माझ्या पायाशीच लवंडली. हा खूपच शुभसंकेत वाटला मला. ती लगबगीने तिच्या सुंदर हातांनी फुलं वेचू लागली. तिच्या चेहर्‍यावर लज्जेचे भाव मला जाणवले. म्हणजे तिच्याही मनात… ? छे! चालली परत माझी गाडी रूळ सोडून!

त्याच दिवशी माझ्या मनाचं पाखरू पुन्हा पंख लावून उडू लागलं. ती एका वयस्कर स्त्रीसमवेत आप्पांसमोर बसली होती. ती स्त्री आप्पांना काही कागद दाखवत होती. ती लाजत होती. मला वाटलं तिची आई… की कोण माझ्यासाठी ह्या सौंदर्यवतीचा प्रस्ताव मांडत होती, किंवा मांडत असावी. असं वाटल्यावर माझ्या मनाचं पाखरू उडणारच ना! उंच… उंच… ! पण… पण मी तर निश्चय केला होता ना लग्न न करण्याचा?

रात्री झोपतांना आप्पा त्या संबंधात मला काही विचारतील, सांगतील असं मला वाटत होतं. किंबहुना मी वाट पहात होतो. पण आप्पांनी चकार शब्दानं काही विषयसुद्धा काढला नाही.

त्यानंतर जवळजवळ महिनाभर ती दिसलीच नाही. कुणाजवळ काय न् कशी चौकशी करणार? माझी बेचैनी वाढत होती. जेवढा मी तिच्या विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो तेवढा त्यात अधिकाधिक अडकत चाललो होतो. रात्रीची झोप लागेना. थोडी लागली तरी स्वप्नात ती दिसत होती.

त्याचा परिणाम पहाटे उठण्यावर, माझ्या जपावर, साधनेवर होत होता. जेवणही जात नव्हतं. अशक्तपणा आला होता. सगळं आरोग्य बिघडलं होतं. कशातच स्वारस्य वाटत नव्हतं. बुद्धीला समजत होतं, तिचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. काही संबंध नाही. पण मन काही ऐकत नव्हतं. वाटत होतं कदाचित आप्पांना त्या स्त्रीनं माझ्यासाठी विचारलं असेल. आप्पांनी परस्पर नाहीम्हणून सांगितलं असेल का? आप्पांना काही विचारण्याचा धीरही होत नव्हता. आप्पांना नको आहे का माझं लग्न? या विचारासरशी मी सटपटलो. आप्पांना काय मला तरी कुठं हवं होतं लग्न आतापर्यंत? पण आता… ? माझ्या मनातल्या युद्धामुळं माझी हालत दिवसेंदिवस खराब होत चालली होती.

आप्पांच्याही लक्षात आलं असावं. आप्पा म्हणालेसुद्धा, ‘‘कारे श्री नीट जेवत नाहीस? चेहरा सुरकुतल्यासारखा दिसतोय. काही होतंय का? तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस रे बाळा. काही त्रास होत असेल तर विश्रांती घे चार दिवस… ’’

‘‘नाही आप्पा तसं काही नाही. ’’

‘‘अरे नाही काय, मी पहातोय तुला नीट जेवण जात नाही. वैद्यांना तब्येत दाखवायची का? ’’

‘‘नाही आप्पा काही काळजी करू नका. ’’

हे सगळं थांबवायला हवं. मी मनाला कठोरपणं बजावलं. दत्तमहाराजांच्या सेवेत खंड पडता कामा नये. उद्या गुरुवार आहे. पालखीची सेवा रुजू करायलाच पाहिजे. आमची तीन पिढ्यांची सेवा, साधना… अशी खंडीत होता कामा नये. दत्तमहाराज काही वावगं होऊ देणार नाहीत. माझ्या भरकटणार्‍या मनाला मी श्रद्धेनं बांधून ठेवलं. आता ती दिसूच नये असं मी म्हटलं. खरंच माझं मन

शांत झालं असं मला तरी वाटलं.

आणि तो क्षण आला. जे हवंसं होतं. पण मी टाळत होतो. गुरुवारची पालखी नेहमीप्रमाणे निघाली. दोन प्रदक्षिणा झाल्या. तिसर्‍या प्रदक्षिणेला पालखी पश्चिम दरवाजाला मी टेकवली. स्तोत्र आणि पदं झाली. करुणात्रिपदी झाली, शेवटचं पद सदानंदानं सुरू केलं. सुरेख आवाज लागला होता. अंतरीच्या तळमळीनं तो गात होता.

 ‘‘आवर मना तू आवर मना

 सांगे तुजला दत्तराणा! ’’

माझं मन शांत होत होतं. तेवढ्यात पुढं वीज चमकावी तसं झालं. पश्चिम दरवाजाच्या समोर काळ्या नक्षीदार खांबाला टेकून ती उभी होती. डोळे मिटून भक्तिभावानं पदं ऐकत होती. ऐकतांना तिची निश्चल समाधी लागली होती. ती… तीच ती! जिला मी विसरू म्हणता विसरू शकत नव्हतो. तिलाही बंद डोळ्यांपुढे मीच दिसत असेन का?

मी भान हरपून तिच्याकडे पहात राहिलो. पहातच राहिलो. तिचा केतकी वर्ण, कमानदार भुवया, कमनीय आकृती… काळ्या दगडात कोरलेलं सुरेख चकाकणारं शिल्प असावं तशी! केवळ अनुपम लावण्य! मी भान हरपून पहातच राहिलो. पद संपल्यावर सदानंदानं मागच्या बाजूनं पालखी उचलली. पण मी जागेवरच उभा… पुतळ्यासारखा! ‘‘श्रीऽ अरे श्रीऽ… ’’ तो हाका मारत होता. पण माझ्या कानात काहीच शिरत नव्हतं. सारा जनसमुदाय मला खाणाखुणा करू लागला पण मी ढिम्म! हळूहळू लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ती वाढत गेली. जगदीशनं मला हलवून हाक मारली. पण माझ्या सार्‍या संवेदनाच गोठून गेल्या होत्या. सारं शरीर जडशीळ झालं होतं. माझी पापणीही हलत नव्हती. शेवटी माझ्या बाजूने पालखी सदानंद आणि जगदीशने हलकीच पुढे नेली.

प्रसाद घेऊन जनसमुदाय परतला. तीही निघून गेली. पण ती माझ्या नजरेत तशीच! मीही जागेवर तसाच. थोड्यावेळानं जगदीश व सदा आले. तरीही मी तसाच होतो. त्यांनी पुन्हा मला हलवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, माझं अंग तापानं फणफणत होतं. त्यांनी उचलून मला घरी नेलं. आप्पांना सांगितलं. वैद्यांना घरी बोलावलं. कपाळावर पट्ट्या, चाटण, काढा सारं काही झालं. मी बराही झालो. पण माझी मनःस्थिती पार बदलून गेली होती. ऐन पौर्णिमेला अंधार दाटून आला.

पालखीचा दिव्य आनंद कुठे लुप्त झाला? दत्तमहाराजांची कृपा, आजोबांची, आप्पांची पुण्याई मला त्यांच्याकडून मिळालेलं संचित, सारं.. सारं कुठे गेलं? त्या सर्व जाणीवाच माझ्या मनातून लुप्त झाल्या. खांबाला टेकून उभी असलेली ती तरुणीच मला दिसत होती. हे काय होत होतं? ज्या गोष्टीचा मी चुकून कधी विचार केला नाही ते माझ्या मनात कुठून आश्रयाला आलं. छे छे हे योग्य नाही अशी मनाची समजूत काढेपर्यंत बुधवार आला.

‘‘श्रीपाद बरा आहेस ना? ’’ रात्री झोपतांना आप्पांनी विचारलं. ‘‘हो आप्पा’’ असं म्हणून मी डोळे मिटले. पण माझी मलाच खात्री नव्हती. ‘‘पालखीच्या स्पर्शानं नक्की बरं वाटेल तुला’’ त्यांच्या भाबड्या आशीर्वादाने मला भडभडून आलं. मी हो म्हटलं न् आतल्याआत कढ दाबत राहिलो.

गुरुवारी संध्याकाळी पालखी घेऊन निघालो. खाली बघतच दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पश्चिम दरवाजाला मात्र माझ्या नजरेनं दगा दिला. त्या खांबाकडे नजर गेली. खांबापाशी ती सौंदर्यवती होतीच. पण आज तिच्या शेजारी एक देखणा तरुण उभा होता. हो माझ्यापेक्षाही खूप देखणा… दोघं एकमेकांकडे बघत होते. माझ्या काळजात तीव्र कळ आली. पुन्हा मागच्या गुरुवारसारखं होऊ नये म्हणून मी जगदीशच्या खांद्यावर पालखी दिली न् खाली बसलो.

बसलो, ते पुन्हा उठूच शकलो नाही. प्रसादाचं आवरल्यावर सदा नि जगदीश आले. मला उचलून घरी घेऊन गेले. काढा, औषधं, चाटण सारं झालं… पण गुण येईना. माझ्या पायातलं त्राणच गेलं. पायातलं नि मनातलंही!

ती सौंदर्यवती दिसली नि माझ्या खांद्यावरच चढून बसली पालखीत! म्हणजे मीच बसवली. पण पालखीतल्या दत्तमहाराजांचं काय? आयुष्यभर मला दत्तमहाराजांशिवाय विषय नव्हता. हे असं का झालं, कळत नव्हतं! हे चूक आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं. आज तर तिच्या शेजारी त्या तरुणाला पाहून मी विद्ध झालो.

सदा नि जगदीशकडून मला कळलं, तिचं नाव नक्षत्रा साने. शहरातून इथे तिच्या मावशीकडे आली होती आणि तो उद्धव क्षेत्रमाडे. भारतीय विमानसेवेत पायलट आहे. त्या दोघांचं पुढच्या महिन्यात लग्न आहे.

हे ऐकल्यावर माझी जगण्याची इच्छाच संपली. मी खाणंपिणं सोडलं. औषधं बंद केली. वैद्य म्हणाले, ‘‘ह्याला काहीतरी मनाचा आजार असावा. शहरात मानसोपचार तज्ज्ञाला दाखवायला हवं. ’’ आप्पांनी खूप समजावलं, पण मी नाहीच गेलो शहरात किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे.

आप्पांची आता सारी भिस्त दत्तमहाराजांवर होती. पण मला आता महाराजांसमोर जाण्याचीही लाज वाटत होती. त्यांच्या जागी मी तिला बसवलं होतं. तिच्या गावीही ते नव्हतं. पण मी मात्र स्वतःला अपराधी समजून खंगत होतो.

तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तर जीवच नकोसा झाला. बळं बळं आप्पा मला कसेबसे दोन घास खाऊ घालत. तेही बिचारे हतबल झाले होते. दिवसेंदिवस माझी हालत फारच वाईट झाली. शरीराचा सापळा झाला. केस, दाढी वाढली. हातापायातलं त्राण गेलं. एक दिवस सदानी मला देवळाच्या ओसरीत नेऊन बसवलं. खांबाला टेकून आणि आता तो रोजच मला तिथंच बसवू लागला. जरा शुद्ध हवा लागेल म्हणून. पण मी तसाच! आणखी खंगत चाललेला. अशी किती वर्ष गेली कुणास ठाऊक. आता मला भगवे कपडे घातले जायचे. दर्शनाला येणारे सहज नमस्कार करायचे.

एक दिवस सदानी मला सांगितलं तिच्या नवर्‍याच्या विमानाचा अपघात झाला आहे आणि तो बेपत्ता आहे. आणि चमत्कारच झाला. एवढ्या दिवसानंतर मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. स्वतःच्या हातांनी थोडं दूध प्यायलो. पुन्हा भगव्या कपड्यांत तिथंच बसून राहिलो. आप्पांच्या डोळ्यांना घळाघळा धारा लागल्या. त्यांनी दत्तमहाराजांचे आभार मानले. मी मात्र आणखीनच तोंड खाली घातलं. दत्त महाराजांना दिसू नये म्हणून.

एक दिवस सहज म्हटलं ‘‘आज पाऊस पडेल… ’’ खरंच पाऊस पडला. कुणाला तो माझ्या शब्दांचा परिणाम वाटला. कुणाची गाय हरवली म्हटलं, ‘‘घाटाच्या पायर्‍यांवर असेल. बोला फुलला गाठ पडली गाय सापडली. ’’

हल्ली वरचेवर असं होऊ लागलं. लोक माझ्या पाया पडू लागले. मला काही-बाही विचारू लागले. मी सांगितलेलं खरं होऊ लागलं असं लोक म्हणू लागले. पालखीच्या सेवेचं फळ इथं दिसत असावं. दत्तमहाराजांची सेवा कधी वाया जाणार नाही. माझं ते झालं ते माझ्यामुळेच. पूर्वसुकृतच असेल ते… तर माझ्या भाकितामुळे मला बराच बोलबाला झाला. दत्तमहाराजांनंतर

लोक माझ्या दर्शनाला येऊ लागले.

एक दिवस ‘ती’ आली. माझ्या पायांवर डोकं ठेवून रडू लागली. म्हणाली, ‘‘महाराज माझं सौभाग्य आता कुठं असेल? कधी भेटेल? अपघातात बेपत्ता झाले आहेत ते. कसे असतील? ’’

मला काय वाटलं कुणास ठाऊक! म्हटलं पौर्णिमेला चालत येईल आपल्या पायांनी. खरंच पौर्णिमेला तो चालत आला. दत्तमहाराजांनी माझ्या तोंडून तिचं भविष्य सांगितलं. ते खरं झालं. दोघंही जोडीने आले माझ्या दर्शनाला. दोघांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. मी हातानं आशीर्वाद दिला ‘‘अखंड सौभाग्यवती भव’’ असं म्हणायचं होतं. पण तोंडून शब्दच फुटेना. माझी वाचाच गेली कायमची. ती मात्र दर पौर्णिमेला येते माझ्या दर्शनाला.

माझ्या जीवनात भर अमावस्येला चांदणं पसरतं लख्ख! त्या चांदण्यांच्या प्रकाशात. माझं जगणं म्हणजे त्या प्रकाशाच्या सावल्याच. सतत प्रकाशाच्या शोधात, स्वतः मात्र कायम अंधारलेल्या.

© शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या देव पाहिला ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ अजि म्या देव पाहिला ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

 २०२० सालची ही गोष्ट. इंस्पेक्टर सूर्यकांत भोसले नुकतेच दौंड पोलिस स्टेशनला बदलून आले होते आणि ही करोनाची धावपळ चालू झाली. कडक शिस्तीचा माणूस, कायद्याच्या जरा विरूध्द गेलं की यांच्या मस्तकावरची शीर थड थड उडायला लागायची.

आज सर स्वत: round ला निघाले होते. कोणी ना कोणी तरी दुकान उघडं ठेवायचा, किंवा उगाच जमावबंदी कशी असते ते बघायला बाहेर पडायचा. असं कोणी सरांच्या तावडीत सापडलं की त्याची खैर नसायची.

आजही तसंच झालं, पाटस गावाला हमरस्त्यावर एका टपरीवजा घराचं शटर अर्धं वर ठेवलेले दिसले. सरांनी जीप साईडला घ्यायला सांगितली आणि जीप थांबायच्या आतच चालत्या जीपमधून उतरून लांब ढेंगा टाकत सर त्या शटरपर्यंत पोचले देखील. आत बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी वगैरेचं छोटंसं दुकान होतं.

swagger stick ने शटरवर खट खट करत सरांनी घुश्यातच विचारलं – कोण आहे रे इकडे आणि हे शटर का उघडं ठेवलंय?  दुकानं बंद ठेवायची आहेत माहित नाही का?

एक सत्तर – पंच्याहत्तर वर्षाची आजी भिंतीचा आधार घेत घेत बाहेर आली – लेकरा, दुकान नाही उघडं ठेवलेलं. म्हाताऱ्याची उन्हानं काहिली होत होती, मधुनच झुळूक आली की जीवाला थंड वाटायचं म्हणून ठेवलं शटर उघडं थोडा वेळ. तू म्हणतोस तर बाबा करते बंद.

म्हातारीला बघून सरांचा राग निवळला होता. बरं, बरं. बाकी घरात कोण असतं?  बोलता बोलता सरांनी घराबाहेरच बुट काढले व देवाला नमस्कार करण्याच्या बहाण्याने घरात एक चक्कर मारून आले. परिस्थिती बेताचीच होती. जेमतेम एक वेळचं जेवण होईल इतपतच शिधा होता.

“लेक पुण्यात हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सुट्टीला घरी यायची, तेव्हा थोडे पैसे घेऊन यायची पण आता या साथीच्या रोगाने तिला रजा मिळत नाही. एरवी या बांगड्या विकून दोन पैसे सुटायचे, पण आता तर दुकानही बंदच आही आणि कोणी गिऱ्हाईक येतही नाही. “

“पण मग पैश्या पाण्याचं, डाळ तांदूळाचं काय? “

” लेकरा, सगळं बेस आहे बघं आणि आम्ही आहोत माळकरी – वारकरी, माऊली या ना त्या रुपाने पाठीशी उभी रहातेच. “

काही न बोलता सर बाहेर आले, माने हवालदारांना त्या आजींचा पत्ता टिपून घ्यायला सांगितला आणि सरकारी योजनेनुसार मिळणारा महिन्याचा शिधा संध्याकाळच्या आत आजीकडे पोचवायला सांगितले. “आणि हो, ” स्वतःच्या पाकिटातून २००० ची नोट काढून हवालदाराच्या हातावर ठेवत सर पुढे म्हणाले, “हेही त्या आजीला दे. मी दिलेत म्हणून सांगून नकोस. “

दुसऱ्या दिवशी मुद्दाम सर त्या आजीकडे गेले. आजी जणू सरांची वाटच बघत होती.

“आलास लेकरा, ये ये. ” समोर मोठा साहेब उभा आहे याची जराही भीती न वाटता आपल्या सहज सुलभ साधेपणाने बोलत होती. “काल तू विचारलंस ना जेवणाखाण्याची सोय काय म्हणून?  काल जेमतेमच शिधा उरला होता. मी विठू माऊलीला साकडं घातलं होतं – माझ्या म्हाताऱ्याला उपाशी ठेवू नकोस म्हणून. आणि देव हाकेला धावला बघ. कुठल्याशा सरकारी ऑफिसातून एक माणूस आला आणि महिन्याचं राशन घरात भरून गेला. त्याच्या रुपानं काल प्रत्यक्ष विठू माऊलीच घरी येऊन गेली बघ. “

आजी बोलत होत्या. तिला थांबवून आजोबा बोलू लागले, “पोरा, त्या बाबाने हे दोन हजार रुपयेही दिलेत खर्चापाण्याला. पण आम्हाला आता कशाला लागतात हे पैसे?  राशन भरलंय, बाकीचा तर खर्च काही नाही. तू हे पैसे घे आणि कोणा गरजू गरीब माणसाला देऊन टाक. त्याला अडीअडचणीला उपयोगी पडतील. आणि लागली आम्हाला गरज, तर तो विठूराया आहेच की मदत करायला. “

त्या आजी आजोबांच्या जगण्याच्या साध्या सोप्या तत्वज्ञानाला सरांकडे उत्तर नव्हतं. त्यांनी निमुटपणे ते दोन हजार रुपये परत घेतले आणि गाडीत बसता बसता माने हवालदारांना म्हणाले – “इतकी निर्मळ श्रद्धाळू माणसं! खरंच, यांच्या रुपाने, अजि म्या देव पाहिला. “

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेकंड चान्स… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ सेकंड चान्स…  ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

दिवाळी संपत आली तसे अनंतमास्तर अस्वस्थ होऊ लागले कारण कोकणातील जत्रा आता सुरु होण्याची वेळ. शिक्षकाची नोकरी करत असले तरी मास्तरांना दशावतार नाटकांची आवड. नोकरी संभाळून ते नाटकें बघत क्वचित पात्र कमी पडले तर तोंडाला रंग फासत. सगळे दशावातरी झिलगे त्यांचे मित्र. पूर्वीचे कलाकार बाबीं नालंद, बाबीं कलिंगण, बागवे, परुळेकर, शेणाई ते सध्याचे कलाकार सुधीर कलिंगण, पार्सेकर, तवटे आदी. पण त्यांच्या दुर्दैवाने ते मुंबईत मुलाकडे अडकले होतें.

त्यांची पत्नी रंजना ही पण निवृत्त शिक्षिका. दोघांनी आता सत्तरी पार केलेली. त्त्यांची दोन मुले. मोठी मुलगी मीनल.. बँकेत नोकरी करणारी, लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाली. तिचा नवरा आयटी मध्ये नोकरी करणारा. मीनलला सातवा महिना लागला तसे तिने आईबाबांना आपल्याकडे बोलावून घेतले. अनंतरावांना एकटे गावी रहाण्याची इच्छा होती पण त्त्यांची पत्नी आणि मुले त्याना एकटे राहू देईनात. त्यामुळे ते पण रंजनाबाईसह पुण्याला आले… मीनलला मुलगी झाली आणि नातीला न्हाऊ घालायला रंजनाबाई पुण्यात अडकल्या. मीनल बँकेत जाऊ लागली आणि तिने विश्वासानें मुलीला आईच्या हातात दिले… नातीला न्हाऊ घालायला.. तिचे कपडे बदलायला बाईंना सुख मिळू लागले. अनंतमास्तर सुद्धा नातीचे काडकौतुक करत राहिले.. पण त्त्यांचे मन मात्र गावी होतें. विशेषतः सण उत्सव आले की त्याना करमत नसे. गावातल्या शेजाऱ्यांची त्याना आठवण येई.. गावातील देवीला नमस्कार करावा असे वाटे.

 रंजनाबाई सुद्धा घरच्या आठवणीने कासावीस होत. जवळजवळ चाळीस वर्षाचा संसार… अत्यन्त कमी पगार ते घसघशीत पगार.. दोन्हीमध्ये त्यांनी संसार केला होता. एक एक भांडे जमवले होतें.. घराभोवती आंब्याची, नारळाची झाडें मोठी केली होती.. कुठूनकुठून फुलझाडें जमवली होती.. ते सर्व सोडून त्याना लेकीकडे यावे लागले होतें.

ती दोघे पुण्याला असतानाच त्यान्च्या मुलाचे.. विशालचे लग्न जमले आणि मुंबईत लग्न झालेपण. विशाल अनुजा एका फायनान्स कंपनीत काम करणारी.. त्यांनी डोंबिवलीत लहानशी जागा घेतली आणि संसार थाटला.

मीनलची मुलगी तीन वर्षांची झाली.. आता आपण दोघे गावी जाऊ असे अनंतमास्तर आणि रंजनाबाई ठरवत असतानाच, त्यान्च्या मुलाचा विशालचा आईला फोन आला..

‘आई..

‘काय रे?  कित्या फोन केल्लास?

‘आई, मीनलताईचा चेडू आता तीन वर्षाचा झाला नाय.

‘होय बाबा.. आता दहा तारखेक तेका तीन पुरी होतली.. आता आमी..

आईचे वाक्य तोडून विशाल म्हणाला..

‘आई.. आता तुमका आमच्याकडे येवचा लागतला..

‘, म्हणजे?  

‘अगे आई.. अनुजाक दिवस गेलेत आणि कडक डोहाळे लागलेत… पोटात काय टिकणा नाय..

‘अरे पण अनुजाच्या आईक बोलाव ना?

‘अगे ती सारखी आजारी आसता.. चार चार दिवसांनी टीका हॉस्पिटलमधी ठेवचा लागता.. तेव्हा तू आणि बाबा हयच येवा..

‘बरा बाबा… तुज्या बाबांच्या कानावर घालतंय..

इकडे मीनलची मुलगी आता तीन वर्षांची होईल आणि मग ती मोन्टेसरीत जायला लागेल आणि त्यामुळे आपण गावी जायला मोकळे.. असा विचार करत असलेल्या अनंतमास्तरना त्यान्च्या पत्नीने हाक मारली..

‘ऐकलंत काय?

‘काय?

‘विशालचो फोन इल्लो..

‘काय म्हणता?

‘आता आपणाक तेच्याकडे जाऊक होया…

‘कशासाठी?

‘अनुजाक तिसरो महिनो लागलो.. कडक डोहाळे लागलेत..

‘होय काय?  मग तिची आई?

‘तिची आई म्हणे सतत शिक आसता.. तेवा आपणाक आता डोंबिवलीक जाऊक होया..

‘अरे कर्मा.. मी गावाक जावचो विचार करत होतंय..

‘आता इतक्यात गाव विसरा.. शेवटी चेडवासाठी पुण्याक इलाव तसे झिलासाठी डोंबिवली..

मीनलच्या मुलीचा तिसरा वाढदिवस पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी अनंतमास्तर आणि रंजनाबाई डोंबिवलीत हजर झाली. सुनेचे डोहाळे त्यांनी पार केलेच आणि सगळे काम स्वतःच्या खांद्यावर घेऊन सुनेला विश्रांती मिळू दिली. त्यामुळे विशाल आणि अनुजा खुश होती. नऊ महिने पार पडले आणि अनुजाला कन्यारत्न झाले.

विशाल अनुजा यांना मुलगी झाली आणि अनुजाच्या माहेरच्या मंडळींनी नाक मुरडलं हे रंजनाबाईच्या लक्षात आले. पण रंजनाबाई खूष होत्या. समाजात स्त्रियानी केलेले पराक्रम त्या पहात होत्या.. शिवाय सध्या सर्व ठिकाणी मुलापेक्षा मुलीचं पुढे जात आहेत.. हे पण त्यानी पाहिले होतें. त्या आनंदाने आपल्या सुनेचे बाळंतपण आणि स्पृहाचा जन्म साजरा करत होत्या.. पुन्हा एकदा नातीचे सर्व त्याच करत होत्या.. अनंतराव त्याना मदत करत होतें.. गावची आठवण होतच होती पण स्पृहा तीन वर्षांची होईपर्यत त्याना वाट पहावी लागत होती.

अनंतराव मध्येच गावी जाऊन येत… आंब्याच्या झाडांना फवारणी करून घेत, माडावरचे नारळ काढून घेत पण रंजनाबाईंना फारसे जायला मिळतं नसे, तरीपण गणपतीला त्या चार दिवस जाऊन येत.. स्पृहा मोठी होत होती आणि तिच्या बाललिलात दोघे मग्न होत असले तरी गावच्या घराची त्याना सतत आठवण येत होती.

दिवाळी संपत आली की अनंतराव अस्वस्थ होत.. आता दहिकाले सुरु होणार.. देवींची पालखी घरी येणार.. तिची ओटी भरायला हवी… स्पृहा आता तीन वर्षांची होत आली म्हणजे या डिसेंबरमध्ये आपण गावी जायचे कायमचे हे निश्चित. त्यानी पत्नीला विचारले..

‘या वर्षीची जत्रा गावतली मा?

‘होय तर.. 30 नोव्हेंबर स्पृहाचो तिसरो वाढदिवस.. मुलीच्या मुलीक तीन वर्षा वाढवली आता मुलाच्या मुलीक तीन वर्षा.. तुम्ही डिसेंबरमधला तिकीट बघून ठेवा..

मास्तर खूष झाले.. कधी एकदा डोंबिवलीच्या गच्च हवेतून गावच्या मोकळ्या हवेत जातो असे त्याना वाटतं होतें.

पंचवीस नोव्हेंबरची सकाळ झाली.. सकाळी सकाळी अनुजा कोरड्या उलट्या करू लागली.. परत परत बाथरूमकडे धावत होती.. रंजनाबाईना अंदाज आला तरीपण त्यांनी मुलाला तिला डॉक्टरकडे न्यायला सांगितले..

दुसऱ्यादिवशी रिपोर्ट्स आले.. अनुजाला परत दिवस गेले होतें.

रंजनाबाई गप्प होत्या.. त्यांनी नवऱ्याला गावी जायची तयारी करायला सांगितली.. अनंतरावांनी बॅग भरायला घेतली.

संध्याकाळी विशाल आईबाबा समोर उभा राहिला..

‘आई.. तुला कळले असेल, अनुजा गरोदर आहे, तेंव्हा..

‘तेंव्हा काय?

‘तेंव्हा तुम्ही दोघांनी इथेच राहावे, असे मला आणि अनुजाला वाटते..

‘अनुजाच्या एका बाळंतपणात मी हय रवलंय.. मीनलच्या पण एका बाळंतपणात मी पुण्याक रवलंय.. म्हणजे तीन वर्षा.. मुली तीन वर्षांची होयपर्यत.. आता तुमी सेकंड चान्स घेतलात.. आणि परत हय रवा म्हणतात, आता शक्य नाय..

‘आई, बाबा असा करू नकात?  आमका तुमची गरज आसा..

‘आमचापण काहीतरी आयुष्य आसा.. आम्ही दोघांनी आयुष्यभर नोकरी केली.. चार गावात बिऱ्हाडा केली.. दोन मुलांका मोठी केली.. शिक्षण दिला, लग्ना करून दिली, आता आमका आमच्या मठीत शांत रवांदे.. तुझे बाबा कंटाळेत, तेंका कधीपासून गावची, गावच्या देवींची, जत्रेची स्वप्ना पडतात..

‘पण आई.. अशी कठोर होऊ नको.. आमका तुमची गरज आसा..

‘गरज कधीच संपाची नाय.. तुमी सेकंड चान्स घेतलात.. कशासाठी?  मुलासाठीच ना?

‘तसा नाय आई, पण..

‘आणि आता परत मुलगी झाली तर.. अजून एक चान्स?

‘स्पृहाचो जन्म झालो तेवा अनुजाची आई, बाबा नाराज झालेले ते मी बघितलंय.. तेनीच परत एकदा मुलासाठी चान्स घेऊक सांगितला असतला..

‘तसा नाय आई, पण..

‘आमी नाय रवा शकत.. आमचो पण नाईलाज आसा.. गेली सहा वर्षा आमी घरापासून लांब आसव.. आता या वयात आमका आमच्या मठीत जाऊक व्हया.. शेवटचे काही दिवस रवलेत.. ते आता एकत्र आणि आमच्या घरात.. आम्ही आमच्या मुलांका वाढवली, आता तुम्ही तुमच्या मुलांका वाढवा.. आता आमची अपेक्षा करू नकात..

‘आई, माझी पंचाईत होईल हो.. स्पृहा पण लहान आहे आणि मला पण ऑफिसला जायला लागेल ना?

‘यावेळी तूझ्या आईला बोलाव.. ती आजारी असते असे म्हणता पण मॉलमध्ये फिरतानाचे तिचे फोटो मी बघते..

‘पण आई..

‘नाही जमणार.. शेवटी आमचे पण काही आयुष्य आहेच ना.. आम्ही सोमवारी गावी जाणार. खुशाली कळवा.. बाळांना घेऊन गावी या, आम्ही वाट पहातो.

 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पेन्शनचा चेक आणि पोळपाट’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ ‘पेन्शनचा चेक आणि पोळपाट’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यात जोशी कुटुंब राहायचं.

बाबा – सुरेशराव. बँकेत मॅनेजर. वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाले.

पेन्शन ४५ हजार. सकाळी पेपर, संध्याकाळी क्लब, रविवारी टीव्ही.

आयुष्य “सेट” झालं.

 

आई – सुमित्रा. वय ५८.

नोकरी नाही. पगार नाही. रजा नाही. सुट्टी नाही. पेन्शन तर नाहीच नाही.

सकाळी ५ ला उठायची… रात्री ११ ला झोपायची.

नाव होतं “हाऊसवाईफ” – पण काम होतं “हाऊस-CEO”.

 

मुलगा अमेरिकेत. मुलगी लग्न होऊन मुंबईला.

घरात दोघंच. पण आईचं काम तेवढंच.

—

निवृत्तीनंतर २ वर्षांनी बाबांना हार्ट ॲटॅक आला.

३ दिवस हॉस्पिटल. आईने रात्र-रात्र जागून सेवा केली.

बाबा घरी आले. डॉक्टर म्हणाले – “आता पूर्ण आराम. काम नको. “

 

बाबा आराम करू लागले. पण आई?

सकाळी ६ ला उठून बाबांसाठी गव्हाचा चीक, पथ्याचं जेवण, गोळ्या, तपासण्या…

दुपारी भाजी-चपाती, संध्याकाळी फळं, रात्री खिचडी.

बाबा म्हणायचे – “अगं, तू पण आराम कर. आता आपण दोघे निवृत्त. “

 

आई हसायची – “अहो, तुम्ही बँकेतून निवृत्त झालात… मी ‘आईपणातून’ कधी निवृत्त होऊ?

पोरगं अमेरिकेत आहे… पण त्याची आवडती पुरणपोळी मी आजही करते… फ्रिजमध्ये ठेवते… वाटतं कधीतरी येईल.

पोरगी म्हणते ‘आई, नको करू त्रास’… पण तिच्या बाळंतपणात मीच ३ महिने खिचडी शिजवली.

तुम्ही आजारी आहात… तुमची औषधं कोण देणार?

आईची ड्युटी ‘मरेपर्यंत’ असते हो… तिला VRS नाही मिळत. “

—

२० वर्षांनंतर… ८० वा वाढदिवस…

 

बाबा ८० वर्षांचे झाले. पेन्शन चालू. तब्येत ठणठणीत.

आई ७८ वर्षांची. कंबर वाकली. गुडघे दुखतात. डोळ्याला कमी दिसतं.

पण सकाळी ५ ला उठतेच.

 

बाबांच्या वाढदिवसाला मुलगा अमेरिकेहून आला, मुलगी मुंबईहून.

मोठी पार्टी. केक. फुगे. फोटो.

सगळे म्हणाले – “बाबा, ८० ला पण कसे तरुण दिसता! “

बाबा हसले – “सगळं श्रेय तुमच्या आईचं. तिने जपलं. “

 

जेवणाची वेळ झाली. टेबलावर १२ पदार्थ.

पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भाज्या, पापड, लोणचं…

मुलगा म्हणाला – “आई, तू केटरर लावला का? एवढं कसं केलंस? “

 

आई हळूच म्हणाली – “नाही रे. रात्री २ वाजता उठून केलं. तुम्ही ५ वर्षांनी आलात ना… वाटलं आवडीचं खायला घालावं. “

 

तेवढ्यात आई चक्कर येऊन पडली.

हॉस्पिटल. ICU. डॉक्टर म्हणाले – “अतिश्रम. शरीर थकलंय. हार्ट वीक आहे. “

 

बाबा ICU बाहेर रडत बसले. म्हणाले – “डॉक्टर, मला घ्या… तिला सोडा. मी निवृत्त आहे… तिची ड्युटी अजून संपली नाही. “

 

मुलगा बाबांचा हात धरून म्हणाला – “बाबा, तुम्ही ६० ला पेन्शन घेतली…

आईने ७८ वर्षं ‘नोकरी’ केली… पगार ०… ओव्हरटाइम २४ तास…

आणि आजही ती ‘रिजाइन’ करत नाही… कारण ‘आई’ या पोस्टला रिजाइन नसतंच. “

—

३ दिवसांनी आई गेली, शेवटचा शब्द…

जाताना आई बाबांचा हात हातात घेऊन म्हणाली –

“अहो, मी जाते… पण काळजी करू नका.

फ्रीजमध्ये ८ दिवसांची भाजी करून ठेवलीय. चपात्या डब्यात आहेत.

तुमच्या गोळ्या कपाटात क्रमाने लावल्यात… चिठ्ठी लिहून ठेवलीय.

पोराला आवडते शंकरपाळी केलीय… त्याला द्या.

आणि हो… तुळशीला रोज पाणी घाला. मी नाही टाकू शकणार आता. “

 

बाबा हमसून हमसून रडले – “अगं, तू गेल्यावर मी काय करू? मी तर काहीच करू शकत नाही. “

 

आई डोळे मिटत म्हणाली –

“तुम्ही काही करू नका… फक्त ‘आठवण’ ठेवा.

की तुमच्या बायकोला ‘निवृत्ती’ मिळाली नाही…

कारण तिने ‘संसार’ नावाची सरकारी नोकरी केली होती…

जिथे ‘डेथ’ हाच रिटायरमेंटचा दिवस असतो. “

 

आई गेली. पण फ्रीज ८ दिवस भरलेला होता.

बाबांनी पहिल्यांदा पोळपाट हातात घेतला…

आणि पहिली पोळी जळली… जळताना डोळ्यात पाणी आलं –

“अरे, ७८ वर्षं ही बाई जळत होती… पण आम्हाला ‘गरम पोळी’ देत होती. “

—

या कथेचे काळजाला भिडणारे ५ बोध…

१. बाबा निवृत्त होतात, आई ‘विसर्जित’ होते…

बाबांना पेन्शन, गौरव समारंभ, शाल-श्रीफळ मिळतं. आईला काय मिळतं? “तू दिवसभर करते काय घरी? ” हा प्रश्न. निवृत्तीनंतर बाबांचं “काम” संपतं… आईचं “काम” दुप्पट होतं – नवऱ्याची सेवा + घर.

२. आईचा ‘पगार’ नसतो… म्हणून ‘किंमत’ नसते का?

जर आईच्या २४ तास कामाचा पगार मोजला… तर महिना 1 लाख होईल. कुक १५ हजार, मोलकरीण ८ हजार, नर्स २५ हजार, टीचर २० हजार, मॅनेजर ३० हजार = आई. पण आपण तिला “फुकट” समजतो.

३. माझी आई काही करत नाही – सगळ्यात मोठं खोटं…

ती सकाळी उठून तुमचा डबा करते… म्हणून तुम्ही ऑफिसला जाता. ती गोळ्या देते… म्हणून बाबा ८० वर्ष जगतात. ती ‘दिसत’ नाही… पण तिच्यामुळे घर ‘चालतं’. वीज दिसत नाही… पण वीज गेली की कळतं.

४. आईला ‘रजा’ हवी असते… ‘पेन्शन’ नाही…

आईला महिन्यातून १ दिवस सुट्टी द्या. तिला म्हणा – “आज तू झोप. जेवण मी करतो. ” ती ४० वर्षं तुमच्यासाठी राबली… तुम्ही १ दिवस तिच्यासाठी राबा. तिची ‘निवृत्ती’ तुम्हीच देऊ शकता.

५. मृत्यूनंतर फोटोला हार घालू नका… जिवंतपणी हाताला फोड येऊ देऊ नका…

आई गेल्यावर “मिस यू आई” स्टेटस टाकू नका. ती जिवंत आहे तोवर तिच्या हातातला पोळपाट घ्या. कारण मेल्यावर स्वर्गात पोळपाट मिळत नाही… आणि तुम्हाला पोळी करता येत नाही.

—

|| शेवटचा मंत्र ||

प्रत्येक मुलाने वाचावा..

“बाबा रिटायर होतात… 

तेव्हा बँक पेन्शन देते.

आई रिटायर होत नाही… 

कारण तिला ‘मरण’ पेन्शन देतं.

बाबा थकले की आराम करतात…

आई थकली तरी स्वयंपाक करते…

कारण पोटाला ‘सुट्टी’ नसते.

जगात एकच नोकरी आहे,

जिथे ‘डेडलाइन’ म्हणजे ‘डेथ’ –

ती नोकरी म्हणजे ‘आईपण’. “

 

आजच घरी जा… 

आईच्या हातातला कपबशी घ्या.

तिला म्हणा – “आई, आजपासून तू निवृत्त.

कारण तू ४० वर्षं काम केलंस… 

आता आमची ड्युटी.

 

ही कथा वाचून डोळ्यात पाणी आलं असेल,

तर ते पाणी वाया घालवू नका.

 

आज आईला फोन करा…

आणि फक्त ३ शब्द बोला…

“आई, दमलीस का? ” बस्स.

तिचा ४० वर्षांची थकवा, तुमच्या ३ शब्दात जाईल.

(सत्य घटनेवर आधारित एक बोधकथा.)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भरणी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “भरणी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

त्या वर्षी मंगळवारी भरणी श्राद्धाचा मुहूर्त निघाला होता. गावातल्या मोठ्या वाड्यात त्या श्रीमंताच्या आई-बापाच्या आत्म्यांना सदगती लाभावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वयंपाकाचा घाट घातलेला होता.

ओली बाळंतीण आणि गेली दीड दिवस उपवाशी असलेल्या शालिनीबाईला तो दिवस ठाऊक होता. नवरा दोन दिवस झालं कुठं पिऊन पडलाय, तिला शोधायला जाता येणार नव्हतं. तीन पोरांच्या पाठीवर चौथं बाळंतपण दोनच दिवसांपूर्वी तिच्या आईनं घरी येऊन करून दिलं होतं… आणि तिची आई तिच्या रोजगाराला गेली होती. गावातल्या लांबवरच्या दुस-या वस्तीत तर होतं शालिनीबाईचं माहेर.

… आज कुठं नाही काही मिळालं पोरांना तरी वाड्यात नक्की मिळेल, अशी तिची खात्री होती. वाड्यावरून सांगावा येईल याची तिने सकाळपासून वाट पाहिली. पण मोठी माणसं… त्यांच्यात पै-पाहुण्यांची गर्दी असेल, विसरली असतील निरोप द्यायला असं वाटून शालिनी वाट बघत थांबली… रात्रीच्या जेवणापर्यंत तरी कुणीतरी पितरं जेवायला पोरांना पाठवून द्या… असं सांगायला येईल… अशी आशा तिला होती.

घरात कुठल्याशा डब्यात दोन मुठी तांदूळ असतील पण ते करून देणार कोण? शरीराचं दुखणे बाजेवरून खाली उतरू देत नव्हतं… त्यात नवं बाळ अंगाला झटत होतं… आईच्या पोटातच काही नसल्यावर बाळाच्या ओठावर तर काय पोहोचणार? पण बाळ प्रयत्न सोडत नव्हतं… आणि आईच्या पोटात तर भुकेचा आगडोंब उसळला होता!

… शेजारी-पाजारी कुणी देतील असं नव्हतं. ते तरी कितीवेळा देणार? नवरा त्यांच्याशी भांडून बसलाय दारुच्या नशेत. आता कोणत्या तोंडाने काय मागायचं कुणाला? शालिनी गप्प राहिली… थोरल्या पोराकडून पाण्याचा तांब्या तेवढा भरून घेऊन जवळ ठेवला होता… भुकेसाठी पाणी तारक असतं… बुडू देत नाही जीवाला!

शालिनीची आई आज रात्री तर काय येऊ शकणार नव्हती. त्यात पावसाची रिमझिम दिवसभर सुरु होती. पोरांना तिच्याकडे पाठवायचं तरी कसं भिजत. वाटेने विचूकाट्याचं भ्या तर होतंच. आई जिथे रहायची तिथल्या मालकाचा कुत्रा होता भलामोठा… तो अंगावर यायचा पोरांच्या. नकोच ते.. शालिनी विचार करीत तळमळत राहिली.

दुपार उलटून गेली. पोरं भूकेकडे काणाडोळा करीत काहीबाही खेळत राहिली शेजा-याच्या अंगणात. संध्याकाळ सरली आणि रात्र होऊ लागली. आठ वाजता कुणीतरी बोलवायला आलं वस्तीत… पितरं जेवायला पाठवा पोरांना… असा निरोप आला. दुपारचा स्वयंपाक बराच शिल्लक असेल बहुदा. वाड्यातून मोठ्या लोकांना बोलावण्याचे निश्चित नसे. किती माणसं येतील कुणास ठाऊक… बहुदा सगळीच जात असत… म्हणून त्यांनी फक्त पोरा-सोरांनाच बोलावयाचा प्रघात पाडला होता.

शालिनी थोरल्याला म्हणाली, ”सोन्या, वाड्यातून येताना थोडं माझ्यासाठी आणशील का रे खायला! काकूला म्हणावं… आई बाळंत झालीय… भूक लागली आहे तिला… आणि तुझा बाप दोन दिवस झालं घरी आला नाही म्हणून सांग… त्या नाही म्हणायच्या नाहीत! “

शालीनीची तिन्ही पोरं आणि शेजारची तीन चार अशी मिळून सातजण गेले वाड्यावर. शालिनीच्या थोरल्या मुलाला मोठा प्रश्न पडला… मागायचं कसं त्या मोठ्या माणसांना. त्यात खिरीचं पातेलं तळाशी गेलेलं दिसलं… आज बहुतेक खीर लवकर संपली असावी. आणखी काही माणसं जेवायला यायची होती. त्यावर काकू सुनांना म्हणाल्या… ”खीर, आमटी संपत आलीये… परत करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तीच वाढा पातळ करून जराशी. आणि कुणाला घरी नका देऊ… अजून बरेच लोक यायचेत. उरलंच तर सकाळी नेऊन देऊ वस्तीवर! ” यावर सुनांनी माना डोलावल्या! शालिनीचा थोरला कसंबसं जेवला… भूकेपुढे काहीही गोडच लागतं… खीर पातळ असली तरी गोडवा होताच.

… त्याने हात धुतल्यावर घरातल्या बाईला म्हटलं… ”काकू, आईनं थोडं वाढून मागितलंय! ” त्यावर ती फणका-याने म्हणाली… ”आता बाकीच्या लोकांना काय वाढू मग? ते काय नाही… जो हाजीर तो वजीर. तुझ्या आईला म्हणावं… सकाळी पाठव कुणाला तरी… उरलं काही तर देईन! ” 

थोरल्या आधीच मुखदुर्बळ. लोकांकडे इतक्या वेळा मागण्याची वेळ आली होती आयुष्यात की आता त्याची लाज वाटू लागली होती त्याला. कधी एकदा मोठा होतोय आणि भाकरी कमवायला लागतोय असं झालं होतं त्या लहानग्या जीवाला.

पोरं घरी आली… शालिनी वाट पहात होती… पोरांच्या रिकाम्या हातांकडे बघून तिचा बांध फुटला! पोरानं लाजून मागितलं नसावं… तिला वाटलं. ती थोरल्याला नको तसं बोलली… जीव चाललाय भुकेनं इथं आणि याला लाज वाटतीय… आता काय माती खाऊ का? बाळाला दूध कसं पाजू?

थोरला आणि सर्वच मुलं रडू लागली… त्यांना आपण जेवून आल्याचं वाईट वाटू लागलं होतं.. पहिल्यांदाच. शालिनी तोंड लपवून रडत राहिली. बाळ तर केंव्हाचंच रडत होतं… भुकेनं!

रात्रीचे दहा वाजत आले होते. थोरला उठला… पायांत चपला असण्याचा संबंधच नव्हता… त्या नव्हत्याच घेतल्या कित्येक दिवसांत. तो थेट अंधारात चालू लागला… दगडधोंडे तुडवीत त्या गावाबाहेर दूरवर असलेल्या अंधा-या वस्तीकडे निघाला. वस्तीवरची कुत्री चाहूल लागताच भुंकू लागली… त्यात आजीच्या घरमालकाचं कुत्रं मोठं अफाट रागीट होतं… ते धावून आलं… थोरला मोठ्या आकांताने किंचाळू लागला… आणि झोपायला निघालेली वस्ती जागी झाली… नशीब मालक जागाच होता.. त्याने त्याच्या कुत्र्याला आवरलं… नाहीतर या पोराचा लचका तुटलाच असता आज.

शालिनीच्या आईनं फडक्यात घरात उरली होती ती दीड भाकरी आणि तिळाची चटणी बांधून घेतली आणि ती लगोलग शालिनीच्या घरी पोहोचली. त्या अंधा-या खोलीत त्या दीड भाकरीच्या चंद्राने मोठा उजेड पाडला… डोळ्यांतून आसवांच्या आणि उरातून दुधाची धार वाहू लागली… आई आणि बाळ… दोघांची भूक पौर्णिमेच्या चांदण्यासारखी आभाळभर पसरली होती.

शालिनीचा नवरा कधीतरी पहाटे येऊन अंगणात झोपला. त्याने येताना पोरांसाठी कसं कुणास ठाऊक खाऊचं एक पुडकं आणलं होतं… त्याला मुंग्या लागून गेल्या होत्या.

दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षे झाली. शालिनी आधी म्हणजे अहेव गेली. त्यामुळे घरी अहेव नवमी जोरात व्हायची. पुढे नवरा गेला आणि मग दोघांचे श्राद्ध एकत्रच करावे लागू लागले. बाईचं श्राद्ध नव-याच्या श्राद्धात उरकून टाकण्याची रीत पडली आहे… असेल काही कारण त्यामागे. पण पितृ म्हणजे एक अर्थ बाप असा असतो… आईचा क्रमांक बोलताना आधी केवळ.

.. थोरला आता खरोखरच मोठा झाला आहे. बहिणी लग्न होऊन सासरी गेल्यात. त्यांना तो भरणीसाठी आग्रहाने बोलावून घेतोच. त्यादिवशी नातलग नंतर जेवतात… वस्तीवर निरोप आधी जातो… जे जेवायला येऊ नाही शकले… त्यांच्यासाठी स्वयंपाक बांधून दिला जातो… नेहमीच!

… आणि… थोरला रात्री सर्वांत शेवटी जेवतो… त्याआधी वस्तीत जातो… एखादी शालिनी जेवायची राहिली आहे का? हे पाहून येतो!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares