श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ आत्मसंवाद… श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आत्मसंवाद या लेखमालेतील शेवटचा लेख सौ.उज्वला केळकर यांचा असून ते सहा भाग आज पुन्हा एकदा वाचले.

ही लेखमाला सुरू करण्याची मूळ कल्पना त्यांचीच. ती चालू करण्यासाठी व चालू ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व धडपड याची आम्हाला कल्पनाआहे.या निमित्ताने दीर्घकाळ गांभीर्याने लेखन करणा-या साहित्यिकांची जडणघडण, लेखनातील विविधता, आलेले अनुभव हे सर्व वाचायला मिळाले व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधी मिळाली.

आज सौ.केळकर यांचा आत्मसंवाद वाचल्यावर मात्र एक वेगळाच अनुभव आला. आपल्या सहवासातील व्यक्ती कशी आहे हे आपल्याला समजले आहे असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात आपण त्या व्यक्तीला खूपच कमी ओळखत असतो.

सांगलीतीलच असल्यामुळे त्यांना भेटण्याचा योग अनेक वेळेला येतो. ‘ई-अभिव्यक्ती’ च्या निमित्ताने अनेक वेळा चर्चाही होते. पण त्यांच्या स्वतःच्या साहित्य प्रवासाविषयी एवढी माहिती कधीच मिळाली नव्हती. ती आज मिळाली.

खरेच, त्यांचा साहित्यप्रवास थक्क करणारा आहे. कथा, कविता, नाट्य, बालसाहित्य, अनुवाद, श्रुतीका, नभोनाट्य अशा विविध प्रांतात सहजतेने प्राविण्य मिळवून इतरांनाही मार्गदर्शन, सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे. आजही त्यांचा उत्साह थक्क करून सोडणारा आहे.

त्यांना उत्तम आरोग्य लाभो व लेखनकार्य अविरतपणे चालू राहो ही सरस्वतीचरणी प्रार्थना.

 

वर उल्लेख केलेले, सौ. उज्वला केळकर यांच्या आत्मसंवाद चे सहा भाग आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता .

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

 

– सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments