श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “इथे थांबणे नाही” – लेखक : रमेश घोलप ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इथे थांबणे नाही
लेखक : रमेश घोलप (भा. प्र. से.)
पृष्ठ: १३६
मूल्य : २५०₹
‘परमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गौरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते.
संघर्षात ‘रडायचं नाही लढायचं! ‘ हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे.
– – पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते. तरुण पिढीने आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







