श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “रहे ना रहे हम– भाग २” – लेखिका : डॉ. मृदुला दाढे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : रहे ना रहे हम– भाग २.
– – – चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या आणखी १४ संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…
लेखिका : डॉ. मृदुला दाढे
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे.
पृष्ठे: १६०
मूल्य: २९५₹
हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
‘रहे ना रहे हम’ या पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्यांनी आपल्या अजरामर गाण्यांनी आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली, अशा १२ संगीतकारांच्या वैशिष्ट्यांविषयी रसिक वाचकांना अवगत केलं होतं. या वैशिष्ट्यांत त्या संगीतकारांच्या संगीताची एकंदर धाटणी, शैली विशद करून लेखिकेने त्यांच्या विविध गाण्यांच्या चालींविषयी, त्यातील ऑर्केस्ट्रेशनविषयी, केलेल्या प्रयोगांविषयी, गाण्यांतील सौंदर्यस्थळांविषयी तपशिलात सांगितलं होतं.
– – ही सर्व वैशिष्ट्य कायम ठेऊन लेखिका डॉ. मृदुला दाढे यांनी त्या पुस्तकाचा हा दुसरा भाग साकारला आहे. या दुसऱ्या भागात त्यांनी आणखी १४ प्रतिभावान, दिग्गज संगीतकारांची आणि त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली आहेत.
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ डॉ. मृदुला दाढे यांचं ‘त्या सुवर्णकाळाला अधिकतेने उलगडणारं आणखी एक पुस्तक… ‘रहे ना रहे हम : भाग – २’.. चित्रपट संगीताच्या रसिक श्रोत्यांना आणि अभ्यासकांना नक्कीच संग्रही ठेवावेसे वाटेल असेच हेही पुस्तक आहे हे नक्की.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







