वीणा कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ इकिगाई – लेखक : हेक्टर गार्सिया / फ्रान्सिस मिरेलस – मराठी अनुवाद : श्री प्रसाद ढापरे ☆ परिचय –  वीणा कुलकर्णी ☆

पुस्तक : इकिगाई

 – – जगायला उमेद देणारा एक जादुई कुंभा

लेखक : हेक्टर गार्सिया / फ्रान्सिस मिरेलस

मराठी अनुवाद : प्रसाद ढापरे

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे.

प्रत्येक निवृत्त व्यक्तीस कॉमन प्रश्न पडतात

  • वेळ कसा घालवायचा?
  • आपण वयस्कर झालोत का?
  • आरोग्य साथ देईल का?
  • घरात स्वतंत्र स्थान राहील का?

या सर्व प्रश्नापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाने वाचावे “इकिगाई ” 

इकिगाई म्हणजे आवडती गोष्ट करण्याची स्फूर्ती व त्यापासून मिळणारा आनंद ही व्याख्या बरोबर आहे. इकिगाई हा मूळ शब्द जपानी. मला मराठी पुस्तक वाचायला मिळाले हे माझे भाग्य आहे. इकिगाई या इंग्रजी पुस्तकाच्या उत्तम मराठी अनुवाद करण्याचे आभार जातात ते प्रसाद ढापरे यांना, की ज्यांनी हे उत्तम मराठी अनुवादित पुस्तक आम्हा मराठी रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले.

“इकिगाई” मनाला चिरतरूण करते. खरंखुरं आनंदी जीवन जगायला शिकवते. भरपूर अर्थार्जन केले की संपन्नता आली हा गोड गैरसमज आहे, पण असे नाही, हे या पुस्तकातून शिकता आले. अर्थार्जनाखेरीजही कला, कौशल्य, वाचन, स्वयंपाक, गाणं, भजन, पर्यटन, नातेवाईक भेटी, समाजकार्य, लेखन, यासारखे अनेक छंद पूर्ण करायचे राहून गेलेले आहेत, हे लक्षातच येत नाही.

खरे तर वय वर्षं 60 झाले, मी थकले/थकलो हे म्हणणे अत्यंत भ्याडपणाचे लक्षण आहे, हे म्हणण्याचे धाडस येते हे पुस्तक वाचले की. थकण्याचे हे वय नाहीच मुळी. उलट वय वर्षे 60 ते 70 हा काळ स्वतंत्र जगायचा. म्हणजे दिवसाच्या 24 तासांचे मालक तुम्हीच. मुक्तछंदाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा काळ.

बांधीलकी, जबाबदाऱ्यांतून मुक्त होतोय याचा अर्थ असा नव्हे की, येथून पुढची दैनंदिनी आराम आराम आणि आरामच करायला पाहिजे. मंडळी, माहित आहे ना, पंडित चाचा नेहरू म्हणायचे “आराम हराम है! ” तेच तर करायचेय आरामाला टाटा, बाय बाय करून छंद व आरोग्य जोपासण्यासाठी वेळ कामी लावायचा हे शिकवले “इकिगाई” नी. आणि उमगले प्रत्येकाचा इकिगाई कशात ना कशात दडलेला आहे.

सतत खाणे, पोटभर जेवणे व टीव्ही मोबाईलमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनच्या आधीन होणे ही न सुटणारी व्यसने आहेत. फेसबुक, व्हॉटसअँपवर स्क्रोलिंग होत राहणार आहे, त्याला अंत नाही. ते एक खेळणं म्हणून मनुष्य वापरतोय आणि मनुष्य कळसूत्री बाहुला झालाय हे कुठेतरी थांबायला हवय हे मनापासून वाटत इकिगाई वाचनानंतर.

पुस्तके सावलीसारखी पाठीशी असतात, हे मनावर बिंबलय लहानपणापासून. ते आज इकिगाईनी सिध्द केलय.

*भूकेपेक्षा कमी म्हणजे 100 ऐवजी 80 टक्के जेवण घेणे, दैनंदिन व्यायाम-योगा व सतत कार्यमग्नता ही त्रिसूत्री देणगी साठीनंतरचे निरोगी जीवन जगण्यासाठी मिळालीय इकिगाईतून. इकिगाईमुळे एक मनुष्य नाही तर पूर्ण कुटुंब व पर्यायाने आपलाा देशही दीर्घायुषी होईल व सर्वाधिक निरोगी ज्येष्ठ लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताची गणना होऊ शकेल.

आवडत्या माणसाच्या प्रेमात पडणे काय असते हे माहित होते, पण आवडत्या पुस्तकाच्या प्रेमात पडणे काय असते याची अनुभूती मिळाली इकिगाईतून.

लव्ह यू इकिगाई. – –

मंत्र मिळालाय मला “तूच तुझ्या निरोगी जीवनाची व आत्मविश्वासू देहाची शिल्पकार! जगू आनंदे!

! थँक्यू इकिगाई !

 

परिचय : वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted